David Beckham : 'बाल विवाह' विरोधात आवाज उठवणाऱ्या आदिवासी तरुणीच्या कामगिरीचे डेविडकडून कौतुक

मध्य प्रदेशातील झाबुआ येथील 17 वर्षीय आदिवासी तरुणी हिमाने शिक्षकांच्या मदतीने स्वतःचा बालविवाह रोखला. तिच्या धाडसाचे इंग्लंडचा माजी फुटबॉलपटू आणि युनिसेफचा सदिच्छादूत डेव्हिड बेकहम याने कौतुक केले आहे.
David Beckham : 'बाल विवाह' विरोधात आवाज उठवणाऱ्या आदिवासी तरुणीच्या कामगिरीचे डेविडकडून कौतुक
David Beckham : 'बाल विवाह' विरोधात आवाज उठवणाऱ्या आदिवासी तरुणीच्या कामगिरीचे डेविडकडून कौतुकDavid Beckham : 'बाल विवाह' विरोधात आवाज उठवणाऱ्या आदिवासी तरुणीच्या कामगिरीचे डेविडकडून कौतुक (फोटो सौजन्य : आयएएनएस)
Published on: 
Updated on: 
  • हिमाच्या बहादुरीची जगभर चर्चा

  • जगभरातील मुलांना पाठबळ देणं गरजेचे

  • डेव्हिड बेकहमची पोस्ट चर्चेत

इंग्लंडचा माजी फुटबॉलपटू कर्णधार आणि यूनिसेफचा सदिच्छादूत डेव्हिड बेकहम याने मध्य प्रदेशच्या झाबुआच्या एका आदिवासी तरुणी हिमाच्या असाधारण साहस आणि हिम्मतीचे कौतुक केले आहे. त्याच्या या कौतुकानंतर झाबुआची ही तरुणी चर्चेचा विषय बनला असून लोक तिच्या कौतुकाची प्रशंसा करत आहेत.

दिग्गज फुटबॉलपटूने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहिली. ज्यात तो म्हणाला की, यूनिसेफसोबत मागील 20 वर्षांच्या कामादरम्यान मी पाहिले की, योग्य पाठिंबा मिळाल्यानंतर मुली कशाप्रकारे नेतृत्व करू शकतात, पुढे जाऊ शकतात आणि आपले निर्णय स्वतः घेऊ शकतील.

हिमाच्या बहादुरीची जगभर चर्चा

डेव्हिड आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हणतो की, 'जागतिक बालदिनी' मी भारताच्या मध्यप्रदेशातील 17 वर्षीय हिमाची गोष्ट आपणास सांगू इच्छितो, जिने शाळेतील शिक्षकांच्या मदतीने आपला बालविवाह रोखला. आता ती आपल्या शिक्षकांच्या पावलांवर पाऊल ठेवत दुसऱ्या मुलींचे भविष्य सावरण्यासाठी मदत करण्याचे स्वप्न पाहत आहे. यूनिसेफ आणि तिच्या सहकार्यांचे स्थानिक पातळीवर करण्यात आलेल्या कार्याशिवाय अशा कथा केव्हाच घडणार नाहीत.

जगभरातील मुलांना पाठबळ देणं गरजेचे

या जागतिक बालदिनानिमित्त आणि त्यानंतरही आपण जगभरातील मुलांना आणि तरुणांना सातत्याने पाठबळ दिले पाहिजे. त्यांची प्रगती नशिबावर अवलंबून राहता कामा नये. संघर्ष, हवामान बदल आणि निधीतील कपात यांसारख्या गोष्टी त्यांच्या प्रगतीसमोर अडथळे निर्माण करत आहेत. मात्र, भविष्यात काय घडणार हे आपल्या सामूहिक निर्णयांवर अवलंबून आहे. प्रत्येक मुलासाठी एक चांगले भविष्य निवडूया.

रविवारी जारी करण्यात आलेल्या सरकारी प्रसिद्धिपत्रकानुसार, झाबुआ येथील या किशोरवयीन मुलीने असामान्य धैर्य आणि दृढनिश्चय दाखवला आहे. कुटुंबीय आणि समाजाकडून बालविवाहासाठी दबाव आणला जात असतानाही या 17 वर्षीय धाडसी मुलीने त्याचा ठामपणे विरोध केला आणि स्वतःचा बालविवाह रोखला. तिने शिक्षण, वैयक्तिक विकास आणि भविष्यातील स्वप्नांना प्राधान्य दिले.

स्थानिक कार्यकर्ते, समुदायातील नेते आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनीही या मुलीला पाठिंबा दिला आहे. तिला कोणत्याही भीतीशिवाय किंवा दबावाशिवाय आपले शिक्षण आणि क्रीडा उपक्रम सुरू ठेवता यावेत, यासाठी आवश्यक ती मदत केली जात आहे.