भारत विरुद्ध यूएई (फोटो- ians)
दोहा येथील वेस्ट एंड पार्क इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम काळ पाकिस्तान आणि भारत यांच्यात महत्वाचा सामना पार पडला. पाकिस्तान अ संघाने प्रथम फलंदाजी करताना भारताला ३१४ रन्सचे टार्गेट दिले होते. मात्र भारत या टार्गेटचा पाठलाग करू शकला नाही. भारताचा संघ २६५ रन्सवर ऑल आउट झाला.
या सामन्यात भारताने निकराची झुंज दिली. कर्णधार तिलक वर्माने शानदार सलाग दुसऱ्या सामन्यात दणदणीत शतक ठोकले आहे. मात्र त्याचे शतक भारताला विजयी करू शकली नाही. तिलक वर्माने १४९ बॉलमध्ये १०० रन्सची शतकी खेळी केली. मात्र दुसऱ्या बाजूने तिलक वर्माला अपेक्षित साथ न मिळाल्याने भारताला विजयापर्यंत पोहोचणे कठीण झाले.
भारत अ संघ आपला पुढील सामना आता २४ तारखेला म्हणजेच उद्या खेळणार आहे. भारत अ संघांसाठी हा सामना महत्वाचा असणार आहे. ग्रुप बी मध्ये भारत अ संघ आपला अखेरचा साखळी सामना संयुत अरब अमिराती म्हणजेच (UAE) विरुद्ध खेळणार आहे. हा सामना भारतासाठी महत्वाचा असणार आहे. या सामन्यात पराभव झाल्यास भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येऊ शकते. त्यामुळे उद्याचा सामना भारतीय संघासाठी करो या मरो स्थितीचा असणार आहे.
आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेत कर्णधार तिलक वर्मा याच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारत अ संघ आपला पुढील साखळी सामना संयुक्त अरब अमिराती विरुद्ध खेळणार आहे. हा सामना २४ नोव्हेंबर रोजी दोहा येथे रंगणार असून, या सामन्याच्या वेळेत मोठा बदल करण्यात आला आहे. याआधी भारत अ संघाने स्पर्धेत खेळलेले दोन्ही सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३:३० वाजता सुरू झाले होते. मात्र उद्याचा सामना सकाळी ११.३० वाजता सुरू होणार आहे.
Ans: रायझिंग स्टार्स आशिया कप २०२६ मध्ये पाकिस्तान अ संघाने भारत अ संघासमोर ३१४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र भारतीय संघाला लक्ष्य गाठता आले नाही आणि संपूर्ण संघ २६५ धावांवर ऑलआऊट झाला.
Ans: रायझिंग स्टार्स आशिया कप २०२६ मध्ये भारत अ संघाने नेपाळविरुद्ध पहिला सामना जिंकला होता, तर पाकिस्तानविरुद्ध दुसऱ्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे भारताच्या खात्यात सध्या २ गुण जमा आहेत.






