सोनल दीनुशा (फोटो- ians)
दुसरी कसोटी सामना जिंकून श्रीलंकेला क्लीन स्वीप देण्याचा प्रयत्न भारतीय संघाचा होता. पहिला कसोटी सामना भारताने 165 रन्सने जिंकला. दुसरा सामना सुरू झाल्यावर भारताने प्रथम फलंदाजी केली. 503 रन्सवर पहिला डाव भारताने घोषित केला. त्यानंतर श्रीलंकेचा संघ 290 रन्स वर ऑल आउट झाला. भारताने श्रीलंकेला फॉलोऑन दिला होता. मात्र दोन्ही डावात सोनल दीनुशाने शानदार शतक ठोकले आहे.
मात्र सोनल दीनुशाने शानदार शतक करत सामना ड्रॉ केला. सोनल दीनुशाने संपूर्ण सिरिजमध्ये 420 रन्स करत सर्वाधिक रन्स करण्याच्या यादीत अव्वल स्थान पटकावले. मात्र सोनल दीनुशाने 420 रन्स केल्याने त्याला प्लेयर ऑफ द सिरिज मिळणे अपेक्षित होते. मात्र भारताचा डावखुरा फलंदाज देवदत्त पडीकलने त्याच्यावर मात केली.
IND Vs SL: श्रीलंकेचा चिवट प्रतिकार! दुसरी कसोटी ड्रॉ; Shubhman Gill म्हणाला, ‘आम्ही ते सर्व…’
भारताचा डावखुरा फलंदाज देवदत्त पडीकलने तिसऱ्या नंबरवर फलंदाजी करत अत्यंत आक्रमक आणि संयमी फलंदाजी केली. देवदत्त पडीकलने या सिरिजमध्ये 328 रन्स केल्या आहे. पहिल्या सामन्यात 167 रन्सची तर दुसऱ्या कसोटीत 117 रन्सची शानदार शतकी खेळी केली. देवदत्त पडीकलने परदेशात पहिल्या कसोटी डावात भारतासाठी सर्वाधिक रन्स करण्याचा सौरव गांगुलीचा रेकॉर्ड पडीकलने मोडला आहे.
IND Vs SL: भारताला लयं रडवलं! ट्रॉफी भारताची, पण हवा श्रीलंकेचीच; कोलंबो टेस्ट ड्रॉ अन् WTC मध्ये…
भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील दुसरा सामना ड्रॉ झाला आहे. त्यावर आता कर्णधार शुभमन गिलने आपली प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही मैदनवार जवळपास 250 पेक्षा जास्त ओव्हर्स फिल्डिंग केली. सामना जिंकण्यासाठी आम्ही सर्व ते प्रयत्न केले. मात्र श्रीलंकेच्या फलंदाजांनी अत्यंत संयमी आणि चांगली फलंदाजी केली. दबावात असताना त्यांनी केलेले पुनरागमन पाहता त्यातून आमहालाही काही गोष्टी शिकायला मिळाल्या.






