भारत विरुद्ध श्रीलंका सामना ड्रॉ (फोटो- ट्विटर)
भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील दुसरा सामना ड्रॉ झाला आहे. मात्र सिरिज भारतीय संघाने जिंकली आहे. त्यातच आता हा सामना ड्रॉ झाल्याने भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये देखील नुकसान होण्याची शक्यता आहे. सध्या भारत या पॉईंट्स टेबलमध्ये पाचव्या स्थानावरच राहण्याची शक्यता आहे. मात्र या सामन्यात श्रीलंकेने भारताला चांगले रडवले असल्याचे पाहायला मिळाले.
श्रीलंकेच्या तळातील फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना रडकुंडीस आणल्याचे पाहायला मिळाले . शुभमन गिलचे बचावात्मक नेतृत्व आणि पावसाचा व्यत्यय यामुळे देखील भारताने जिंकता येणारा सामना गमावला. भारतीय संघाने ही सिरिज 1-0 ने जिंकली आहे.
या सामन्यात भारतीय संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. भारताने पहिल्या डावात 503 रन्स केल्या. त्यानंतर श्रीलंकेचा संघ 290 रन्सवर ऑल आउट झाला. त्यामुळे भारतीय संघाने श्रीलंकेला फॉलोऑन दिला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले. मात्र तिथूनच भारताचा हा सामना जिंकण्याचा हेतू साध्य झाला नाही.






