मुंबई : भारतीय क्रिकेट संघात सध्या खेळणाऱ्या दिग्गज खेळाडूंमध्ये एक सर्वात अनुभवी खेळाडू म्हणजे ‘दिनेश कार्तिक’. दिनेश कार्तिक हा यष्टीरक्षक फलंदाज असून तो एक अनुभवी खेळाडू आहे. महेंद्रसिंह धोनीच्या समकालिन असल्याने कार्तिक एकेकाळी भारतीय संघाबाहेर पडला होता. तो क्रिकेट मधून निवृत्ती घेऊन कॉमेंट्री करेल असे वाटत होते. परंतु आयपीएल २०२२ मध्ये आरसीबीकडून दमदार खेळी करत सर्वाधिक स्ट्राईक रेटच्या जोरावर त्याने थेट टीम इंडियामध्ये स्थान मिळवले.
दिनेश कार्तिकच्या चांगल्या फॉर्ममुळे त्याला यंदाच्या आयसीसी टी२० विश्वचषकासाठीही संघात स्थान मिळाले आहे. भारतीय संघात राहून विश्वचषक खेळणे हे प्रत्येक भारतीय खेळाडूचे स्वप्न असते. मात्र अनेक वर्ष क्रिकेटमध्ये सक्रिय असूनही दिनेश कार्तिकला ती संधी मिळाली नव्हती. अखेर यंदाच्या विश्वचषकात खेळण्याची संधी मिळाल्यामुळे त्याने आपल्या भावनांना ट्वीटच्या माध्यमातून वाट मोकळी करून दिली आहे. संघात निवड झाल्यानंतर दिनेश कार्तिकने ट्वीटरवर “हो स्वप्न पूर्ण होतात!” असे लिहिले आहे. या ट्वीटच्या माध्यमातून मोजक्या मात्र अर्थपूर्ण शब्दात दिनेश कार्तिकने आपल्या भावना मांडल्या आहेत.
Dreams do come true ?
— DK (@DineshKarthik) September 12, 2022
टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रवीचंद्रन आश्विन, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल.
राखीव खेळाडू – मोहम्मद शमी, दीपक चाहर, रवी बिश्नोई आणि श्रेयस अय्यर