क्रिकेट विश्वचषक 2023 (world cup) चा विजेता ऑस्ट्रेलियन खेळाडू मिचेल मार्श वर्ल्ड कप ट्रॉफीसोबतचा एक फोटो व्हायरल झाला होता. मार्श त्याच्या समोर ठेवलेल्या ट्रॉफीवर पाय ठेवून सोफ्यावर बसलेला दिसत आहे. या फोटोवरुन बराच वाद झाला. अनेकांनी या प्रकरणी कारवाई करण्याचीही मागणी केली होती. आता याबाबत नवी माहिती समोर येत आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडू मिचेल मार्श विरुद्ध भारतात एफआयआर दाखल (FIR registered Against mitchell marsh) करण्यात आला आहे. दिल्ली गेट पोलिस ठाण्यात हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. एका आयटीआर कार्यकर्त्याने एफआयआर दाखल करून मार्शवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.
[read_also content=”जागेच्या वादातून अंगावर कार घालून महिलेसह अडीच वर्षांच्या मुलाची हत्या, संतापाच्या भरात शेजाऱ्याचंं कृत्य https://www.navarashtra.com/crime/argument-with-neighbors-over-space-killing-a-woman-and-a-two-and-half-year-old-boy-in-ahmednagar-nrps-483600.html”]
पंडित केशव नावाच्या भारतीय आयटीआर कार्यकर्त्याने ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूविरुद्ध दिल्ली गेट पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केला आहे. अष्टपैलू मिचेल मार्शने विश्वचषक विजेत्या ट्रॉफीवर पाऊल ठेवल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यांच्या या वृत्तीने 140 कोटी भारतीयांच्या भावना दुखावल्या आहेत. तक्रार आल्यानंतर पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. मार्शला भारतात खेळण्यास बंदी घालण्याची मागणीही आयटीआर कार्यकर्त्यांनी केली आहे. त्यांनी एफआयआरची प्रत पीएम मोदी आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनाही पाठवली आहे.