बालपणीचं स्वप्न, ऐतिहासिक मैदान! दिल्लीच्या 'होम कोर्स'वर पुन्हा चमकण्यासाठी शुभंकर शर्मा उत्सुक

Sports: २०२५ आणि २०२६ मध्ये लागोपाठ 'मास्टर्स' जिंकणारा रॉरी मॅकलरॉय या स्पर्धेचे मुख्य आकर्षण आहे. त्याच्यासोबत अरॉन राय आणि रायन फॉक्सदेखील खेळणार आहेत.
Golfer Shubhankar Sharma
शुभंकर शर्मा (फोटो- सोशल मिडिया)
Published on: 
Updated on: 
  • गोल्फपटू शुभंकर शर्मा वर्ल्ड इंडिया चॅम्पियनशिपमध्ये सहभागी
  • फॉर्ममध्ये परतण्यासाठी गोल्फपटू शुभंकर शर्मा उत्सुक
  • दिग्गज खेळाडूंचा असेल सहभाग

पुणे/Sports: भारताचा गोल्फपटू शुभंकर शर्मा डीपी वर्ल्ड इंडिया चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे. ही स्पर्धा दिल्ली गोल्फ क्लबमध्ये १५ ते १८ ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. विशेष म्हणजे याच ऐतिहासिक गोल्फ (Sports) कोर्सवर शुभंकरने बालपणी खेळाचे बारकावे शिकले, अनेक आठवणी जपल्या आणि मोठ्या मंचावर खेळण्याचे स्वप्न पाहिले. त्यामुळे त्याच्यासाठी हा भावनिक क्षण असणार आहे.

सुमारे ४० लाख डॉलर (सुमारे ३८ कोटी ७१ लाख रुपये) बक्षीस रक्कम असलेल्या या स्पर्धेत शुभंकर भारतातील एका प्रस्थापित आंतरराष्ट्रीय खेळाडूच्या रूपात पुनरागमन करत आहे. या स्पर्धेत तो यंदाच्या वर्षी मधील जगातील सर्वोत्तम खेळाडूंसोबत खेळताना दिसेल. शुभंकर म्हणाला, मी दिल्ली गोल्फ क्लबमधील जागतिक गोल्फ स्पर्धेसाठी खूप उत्सुक आहे. हे माझ्यासाठीच नाही, तर सर्व भारतीय खेळाडूंसाठी एक अत्यंत खास ठिकाण आहे. मागील वर्षी अनेक अव्वल खेळाडू इथे आले होते आणि त्यांना हा अनुभव खूप आवडला होता. आता इतर खेळाडूंमध्येही या स्पर्धेबाबत प्रचंड उत्सुकता आहे.

दिग्गज खेळाडूंचा असेल सहभाग

२०२५ आणि २०२६ मध्ये लागोपाठ 'मास्टर्स' जिंकणारा रॉरी मॅकलरॉय या स्पर्धेचे मुख्य आकर्षण आहे. त्याच्यासोबत अरॉन राय आणि रायन फॉक्सदेखील खेळणार आहेत. याचा अर्थ मास्टर्स, पीजीए चॅम्पियनशिप आणि ओपन चॅम्पियन्सचे विजेते दिल्लीत प्रत्यक्ष खेळताना दिसतील. याशिवाय या स्पर्धेचा गतविजेता टॉमी फ्लीटवुडदेखील मैदानात उतरेल.

त्यांच्यासोबत मास्टर्स विजेता पॅट्रिक रीड, माजी यूएस ओपन विजेता जस्टिन रोज आणि ओपन विजेता शेन लोरी यांसारखे दिग्गज खेळाडूही खेळताना दिसतील. या सर्वांमध्ये भारताचा शुभंकर शर्मा एक असेल. अर्थात, त्याला घरच्या प्रेक्षकांचा पाठिंबा असेल. त्याचे घरचे मैदान असल्याने निश्चित फायदा त्याला होईल.

शुभंकरसाठी हा हंगाम फारसा सोपा राहिलेला नाही. अनेक स्पर्धांमध्ये कट पूर्ण न करता आल्यामुळे त्याची कामगिरी म्हणावी तशी झाली नाही. क्लबमधील नवीन शाफ्ट्ससह उपकरणांमध्ये केलेल्या बदलांमुळे त्याला जुळवून घेण्यासाठी अधिक वेळ लागला. तरीही, त्याची लय पूर्णपणे बिघडलेली नाही. सप्टेंबरमध्ये झालेल्या 'ओमेगा युरोपियन मास्टर्स'मध्ये शुभंकरने पहिल्या फेरीत उत्कृष्ट ६-अंडर ६४ अशी कामगिरी केली. कोणतीही बोगी न करता खेळताना त्याने डीपी वर्ल्ड टूरच्या क्रमवारीत वेगाने पुढे जाणाऱ्या पूर्वीच्या शुभंकरची आठवण करून दिली. वीकेंडला त्याची कामगिरी थोडी घसरली, तरीही पहिले १८ होल्स त्याच्यातील क्षमता अजूनही कायम असल्याचे दाखवण्यासाठी पुरेसे होते.