'He must have some selfish motive...', Harbhajan Singh targets Lalit Modi after 'that' video
Sreesanth-Harbhajan Singh controversy video : आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदींकडून अलीकडेच श्रीसंत आणि हरभजन सिंग यांच्यातील वादाचा एक व्हिडिओ पुन्हा प्रसारित करण्यात आला. या व्हिडीओमध्ये हरभजन सिंग श्रीसंतच्या कानात मारताना दिसून येत आहे. या व्हिडिओमुळे आता क्रीडा जगतात चनगळचा गदारोळ उडाला आहे. याअबबत सुरुवातीला श्रीसंतच्या पत्नीकडून आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांच्यावर निशाणा साधला तर आता हरभजन सिंगने देखील आता ललित मोदीला यांना धारेवर धरले आहे.
इन्स्टंट बॉलिवूडशी बोलतअ असताना भारताचा माजी स्टार फिरकीपटू हरभजन सिंगने ललित मोदींबाबत आपली प्रतिक्रिया मांडली. हरभजन सिंग म्हणाला की, ” व्हिडीओ जय पद्धतीने प्रसारित करण्यात आला ते खूप चुकीचे आहे. कहर तर ही घडायला नको होते. मला वाटतं यामागे त्याचा काही एक स्वार्थी हेतु असायला हवा. १८ वर्षांपूर्वी घडलेल्या प्रकाराला लोक विसरले आहेत आणि आता तो लोकांना याबाबत पुन्हा आठवन करून देत आहे.”
हरभजन सिंग पुढे म्हणाला की, “जे काही घडून गेले आहे, त्याबाबत मला अद्यापही वाटते. आम्ही खेळत असताना प्रत्येकाच्या मानत काही न काही सुरू होते. यांच्याकडून चुका झाल्या आणि आम्हाला त्याची लाज वाटते आहे. माझ्याकडून देखील चूक झाली आहे. मी प्रत्येक टप्प्यावर त्याची माफी मागत आलो आहे. आज मी बाप्पाकडे आलो असून मी इथेही माफी मागत आहे.”
हरभजन सिंग पुढे बोलला की, “आपण माणसे असून चुका होत असतात पण ज्या पद्धतीने व्हिडिओ बाहेर काढण्यात आला आहे. तो पूर्णपणे चुकीचा आहे. कोणी देखील अशा गोष्टी करू नयेत. लोक ते विसरून गेले होते. त्यामागे त्यांचा काही एक स्वार्थी हेतू नक्की असावा. मला त्याबद्दल खूप लाज वाटते आहे.”
माहितीसाठी, ललित मोदी यांच्याकडून एका पॉडकास्टमध्ये मायकेल क्लार्कशी बोलत असताना असे देखील स्पष्ट करण्यात आले होते की, “ही क्लिप त्यांच्या सुरक्षा कॅमेरा फुटेजमध्ये सापडली आहे, कारण त्यावेळी ब्रॉडकास्टरकडून त्यांचे कॅमेरे बंद करण्यात आले होते. व्हिडिओमध्ये दिसत आहे की सामन्यानंतर हस्तांदोलन करतेवेळी हरभजनने श्रीशांतला बोलवले आणि त्याला कानशीलात मारली. ही घटना आयपीएल २००८ मध्ये घडली आहे.”