हिंदवी वॉरीयर्स करंडक (फोटो- सोशल मिडिया)
फुरसुंगी येथील वॉरीयर्स क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत अनुष्का वाईकर हिने केलेल्या अष्टपैलु खेळीच्या जोरावर डिलीजंट क्रिकेट क्लबने जोश प्रो क्लबचा ५९ धावांनी सहज पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना डिलीजंट क्रिकेट क्लबने ४१.४ षटकात १६८ धावांचे लक्ष्य उभे केले.
काव्या मोहोळ (२२ धावा) आणि अनुष्का वाईकर (२१ धावा) यांनी संघाचा डाव उभा केला. जयीता दुबे हिने तीन गडी बाद केले. अर्णवी शिंदे आणि तनिष्का गायकवाड यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. या लक्ष्याचा पाठलाग करताना जोश प्रो क्लबचा डाव ३१.४ षटकात १०९ धावांवर संपुष्टात आला. वेदीका एन. (१४ धावा) आणि पायल पवार (१२ धावा) यांनी प्रतिकार केला. इश्वरी भांदरे आणि अनुष्का वाईकर यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले. अमृता घुगे आणि मुक्ता परमशेट्टी यांनी प्रत्येकी दोन गडी बाद करून संघाचा विजय सोपा केला.
Ranji Trophy 2026: कमबॅकचा आनंद अन्…! ;न्यूझीलंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा ‘हा’ वाघ जखमी, अडचणी वाढणार?
स्वरा गाडे हिने केलेल्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर अजित वाडेकर ॲकॅडमीने चांगभल ॲकॅडमीचा ८ गडी राखून पराभव केला. प्रथम खेळणाऱ्या चांगभल क्रिकेट ॲकॅडमीचा डाव ६९ धावांवर गडगडला. अनुष्का राठोड हिने एकहाती २१ धावा केल्या. अजित वाडेकर संघाच्या स्वरा गाडे हिने पाच धावांत तीन गडी बाद केले. युगंधरा भापकर आणि प्रांजली पिसे यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. हे लक्ष्य अजित वाडेकर ॲकॅडमीने १९.४ षटकात व २ गडी गमावून पूर्ण केले. आर्या व्यास (२५ धावा), स्वरा कुंजीर (१७ धावा) आणि सायली शिंदे (नाबाद १० धावा) यांनी धावा करून संघाचा विजय निश्चित केला.
याला म्हणतात पॅशन! निकेतची वादळी शतकी खेळी; Spartan Monsoon League मध्ये टायटन बुल्स्चा थरारक विजय
सामन्यांचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरी
डिलीजंट क्रिकेट क्लबः ४१.४ षटकात १० गडी बाद १६८ धावा (काव्या मोहोळ २२, अनुष्का वाईकर २१, जयीता दुबे ३-२१, अर्णवी शिंदे २-१५, तनिष्का गायकवाड २-२०) वि.वि. जोश प्रो क्लबः ३१.४ षटकात १० गडी बाद १०९ धावा (वेदीका एन. १४, पायल पवार १२, इश्वरी भांदरे ३-३, अनुष्का वाईकर ३-२०, अमृता घुगे २-८, मुक्ता परमशेट्टी २-३०); सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडूः अनुष्का वाईकर; चांगभल क्रिकेट ॲकॅडमीः ३०.३ षटकात १० गडी बाद ६९ धावा (अनुष्का राठोड २१, स्वरा गाडे ३-५, युगंधरा भापकर २-६, प्रांजली पिसे २-१) पराभूत वि. अजित वाडेकर ॲकॅडमीः १९.४ षटकात २ गडी बाद ७३ धावा (आर्या व्यास २५, स्वरा कुंजीर १७, सायली शिंदे नाबाद १०, जीविका बोरसे १-८); सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडूः स्वरा गाडे.






