KL राहुलचा रेकॉर्ड (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
लोकेश राहुल ८७ चेंडूमध्ये १२९ धावा करत नाबाद राहिला. यादरम्यान त्याने १० चौकार आणि ६ छक्के मारले आहेत. पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करायला आलेल्या राहुलने कमालीची फलंदाजी करत चाहत्यांचे मन जिंकून घेतले आहे. राहुल जेव्हा फलंदाजीसाठी मैदानात आला तेव्हा भारताची अवस्था १४१ धावा करून ३ विकेट्स अशी होती. केवळ २५ ओव्हर्सचा खेळ बाकी होता. राहुलने अत्यंत सावधगिरीने खेळ सुरू केला. दुसऱ्या बाजूने विकेट्स गेल्या असल्या तरीही राहुल भक्कमरित्या उभा राहिला आणि शेवटच्या ५ षटकांमध्ये ३५० धावांचा टप्पा भारतीय संघाला पार करून दिला. राहुलने आठव्या विकेट्ससाठी ६१ धावांची भागीदारी केली, दरम्यान यात गुरनुर ब्रारचा वाटा केवळ ८ धावांचा होता.
139: युवराज सिंह विरूद्ध सिडनी ऑस्ट्रेलिया 2004
134: एम एस धोनी विरूद्ध इंग्लंड कटक 2017
129*: केएल राहुल विरुद्ध वेस्ट इंडिज न्यू चंदीगढ 2026
124: एम एस धोनी विरूद्ध ऑस्ट्रेलिया नागपूर 2009
राहुलने हे शतक केवळ ८० धावांमध्ये पूर्ण केले आहे. एकदिवसीय करिअरमधील राहुलचे दुसरे सर्वात जलद शतक आहे. याआधी त्याने २०२३ मध्ये एकदिवसीय विश्वचषकात नेदरलँड्सविरुद्ध ६२ चेंडूमध्ये शतक केले होते. लोकेश राहुलची ही खेळी अधिक खास आहे कारण दुसऱ्या बाजूने मात्र भारतीय संघाच्या खेळाडूंच्या विकेट्स पडत असताना त्याने अत्यंत संयमी खेळी केली. दुसऱ्या बाजूला नक्की काय होत आहे याचा त्याने स्वतःच्या मनावर कोणताही परिणाम होऊ दिला नाही. ४२ चेंडूमध्ये त्याने अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर त्याने ८० चेंडूत शतक पूर्ण केले आणि धडाका चालू ठेवत केवळ ८७ चेंडूमध्ये त्याने नाबाद १२९ धावा पूर्ण केल्या.
IND vs WI Playing XI: रविंद्र जडेजा Out, सिराज In, तिसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघ करणार का बदल?






