
IND W vs SL W: Deepti Sharma dominated the year 2025! She established a special dominance with 'this' record.
Deepti Sharma made her mark in the year 2025 : भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार अष्टपैलू दीप्ती शर्मा आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधत आहे. दीप्ती शर्मासाठी २०२५ हे वर्ष संस्मरणीय राहिले आहे. दीप्तीने एकदिवसीय क्रिकेट, टी२० आणि महिला प्रीमियर लीगमध्ये महत्वाचे टप्पे गाठले आहे. ती २०२६ मध्ये एका नवीन विक्रमासह प्रवेश करणार आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाने २ नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत पहिल्यांदा एकदिवसीय विश्वचषकावर नाव कोरले.
हेही वाचा : T20 World Cup 2026 : अफगाणिस्तानचा टी-२० विश्वचषकासाठी संघ जाहीर! १५ सदस्यीय संघात ‘या’ खेळाडूंचे खुलले नशीब
दीप्ती शर्माने भारताला विश्वविजेते बनवण्यात फलंदाजीसह गोलंदाजीमध्ये देखील महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अंतिम सामन्यात तिने ५८ धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली होती आणि चेंडूने ५ विकेट्स देखील घेतल्या होत्या. देशाला जेतेपद जिंकून देण्यात संस्मरणीय भूमिका बाजावून शर्माने आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरले आहे. या स्पर्धेत दीप्तीने २२ विकेट्स घेतल्या आणि २१५ धावा फटकावल्या आहेत. तिच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल तिला प्लेअर ऑफ द टूर्नामेंट पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते. दीप्ती शर्मा ही हा सन्मान मिळवणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे.
२०२५ च्या एकदिवसीय विश्वचषकानंतर, महिला प्रीमियर लीग २०२६ साठी लिलाव प्रक्रिया संपन्न झाली आहे. दीप्ती शर्माला आरटीएम (राईट ऑफ टाइम ट्रेड) योजनेअंतर्गत यूपी वॉरियर्सने संघात स्थान दिले आहे. आरटीएमसाठी निवड झालेली ती महिला प्रीमियर लीगच्या इतिहासातील पहिली खेळाडू बनली आहे. यूपी वॉरियर्सने तिला ३.२० कोटी रुपयांमध्ये आपल्या संघात समाविष्ट केले आहे.
हेही वाचा : टी-२० विश्वचषक स्पर्धेपूर्वी पाकिस्तानला मोठा झटका! स्टार खेळाडू वेगवान गोलंदाज दुखापतग्रस्त
२०२५ च्या समाप्तीच्या एक दिवस आधी, ३० डिसेंबर रोजी, दीप्ती शर्माने आणखी एक महत्त्वाचा विक्रम प्रस्थापित केला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या टी२० मालिकेतील पाचव्या सामन्यात एक विकेट घेऊन, ती महिलांसाठी आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाज ठरली आहे. दीप्तीने आता १३३ सामन्यांपैकी १२० डावात १५२ विकेट घेण्याची किमया साधली आहे. दीप्तीने ऑस्ट्रेलियाच्या मेगन शटला पिछाडीवर मागे टाकले,जीच्याकडे १२३ सामन्यांमध्ये १५१ विकेट जमा आहेत. दीप्ती सध्या आयसीसी टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या स्थानी आहे. याचा अर्थ ती २०२६ मध्ये नंबर वन टी-२० गोलंदाज आणि या फॉरमॅटमधील सर्वात यशस्वी गोलंदाज म्हणून प्रवेश करताना दिसणार आहे.