भारत विरुद्ध श्रीलंका (फोटो- ट्विटर)
भारत-श्रीलंका कसोटीचा चौथा दिवस पूर्ण
श्रीलंकेच्या संघाकडे 16 रन्सची आघाडी
भारताला विजयासाठी करावी लागणार प्रतीक्षा
India Vs Sri Lanka Test Match Live Updates: सध्या भारत आणि श्रीलंकेत दुसरा कसोटी सामना सुरू आहे. आज सामन्याचा चौथा दिवस पार पडला. आज श्रीलंकेचा संघ 290 वर ऑल आउट झाला. त्यानंतर भारतीय संघाने श्रीलंकेला फॉलोऑन दिला आणि दुसऱ्या डावात प्रथम फलंदाजी करण्यासाठी बोलावले. मात्र दुसऱ्या डावात देखील श्रीलंकेची स्थिती बिकट झाला आहे. चौथ्या दिवशीचा खेळ पावसामुळे काही काळ थांबवण्यात आला. त्यामुळे भारतीय संघाला विजेसाठी उद्याच्या म्हणजेच शेवटच्या दिवसाची वाट पहावी लागणार आहे.
आज श्रीलंकेचा संघ पहिल्या डावात 290 रन्स वर ऑल आउट झाला. भारतीय संघाने अत्यंत अचूक गोलंदाजी केली. कुलदीप यादवच्या जागी खेलोणाऱ्य सारांश जैनने आज चांगली गोलंदाजी केली त्याने 2 विकेट्स पटकावल्या. तसेच रवींद्र जडेजाने 3 विकेट्स घेतल्या. सोनल दीनुशाने श्रीलंकेकडून 103 रन्सची खेळी केली.
IND vs SL: अरेरे! काय ही अवस्था, फॉलोऑन खेळणाऱ्या श्रीलंकेच्या २ विकेट्स, अजूनही १३० धावांनी मागे
तर 290 रन्सवर ऑल आउट झालयावर भारतीय संघाने श्रीलंकेच्या संघाला फॉलोऑन दिला. मात्र या डावात देखील श्रीलंकेची फलंदाजी ढेपाळली आहे. लाहिरू उदारा केवळ 3 रन्स करून आउट झाला. तर कामिल मिश्राला ३२ रन्सची खेळी केली. पासिनदू सूर्यबंदराने लढा देण्याचा एकतर्फी प्रयत्न केला. त्याने शानदार 92 रन्सची खेळी केली. कामिंदू मेंडिसने शानदार 55 रन्सची आक्रमक खेळी करत श्रीलंकेचा डाव सावरला. तर कर्णधार धनंजय डी सिल्वा पुन्हा पेशी ठरला. श्रीलंकेने दुसऱ्या डावात देखील आपल्या 6 विकेट्स गमावल्या आहेत. तर श्रीलंकेकडे सध्या 16 रन्सची आघाडी घेतली आहे. विजयासाठी श्रीलंकेच्या संघाला मोठी आघाडी उभी करावी लागणार आहे.
Rain brings an early end to Day 4! Sri Lanka 229/6 in the 2nd innings, lead by 16 runs. Scorecard ▶️ https://t.co/r9FgXSdsMf#TeamIndia | #SLvIND pic.twitter.com/zpYEUDEU2Z — BCCI (@BCCI) August 26, 2026
भारतीय संघाने दोन्ही डावात चांगली गोलंदाजी केल्याचे दिसून आले. सारांश जैनने देखील चांगली गोलंदाजी केली. प्रसिद्ध कृष्णाने एक विकेट घेतली. तर मोहम्मद सिराजने देखील एक विकेट घेतली. तर मानव सुथार चांगल्या फॉर्ममध्ये आहे. दुसऱ्या सामन्यात देखील त्याने आपल्या फिरकीने श्रीलंकेचे कंबरडे मोडले आहे. सारांश जैनने दुसऱ्या डावात एक विकेट घेतली. तसेच रवींद्र जाडेजादेखील एक विकेट घेतली. भारत हा सामना जिंकण्याच्या उंबरठ्यावर आहे. दुसरा सामना जिंकून भारत श्रीलंकेला क्लीन स्वीप देण्याच्या तयारीत आहे. सिरिज जिंकल्यावर भारताच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट्स टेबलमध्ये देखील फायदा होणार आहे.






