फोटो सौजन्य - सोशल मीडिया
अल्टिमेट टेबल टेनिस लीग : भारतामध्ये ज्याप्रकारे कबड्डी लीग, खो-खो, बॅडमिंटन, क्रिकेट लीग आयोजित केले जातात त्याचप्रकारे टेबल टेनिस लीग देखील आयोजित केले जातात. यामध्ये अनेक युवा खेळाडूंना संधी मिळत असते. चेन्नईच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर शुक्रवारी अल्टिमेट टेबल टेनिसच्या पाचवा सिझन सुरु आहे. यामध्ये सध्या ८ संघ सहभागी झाले आहेत. यामध्ये अहमदाबाद, गोवा, चेन्नई, दिल्ली, जयपूर, बंगळुरू, पुणे आणि मुंबई या संघाचा समावेश आहे. यामध्ये कालच्या सामन्यामध्ये पुणेरी पलटणच्या अंकुर भट्टाचार्जीने सामन्यामध्ये कमाल करून दाखवली आणि संपूर्ण देशाला चकित केले. त्याच्या खेळाने चाहते प्रभावित झाले आहेत.
हेदेखील वाचा – बांग्लादेशच्या वादानंतर आता शाकिब अल हसनवर मर्डर केस, वाचा संपूर्ण प्रकरण
पुणेरी पलटणचा काल सामना अहमदाबाद एसजी पायपर्स यांच्या विरुद्ध पार पडला. कोलकात्याच्या 17 वर्षीय युवा टेबल टेनिस खेळाडूंनी फ्रान्सच्या बार्डेटचा 3-0 (11-8, 11-5, 11-8) असा पराभव करून चार गेमची आघाडी संघाला मिळवून दिली.
सामना झाल्यानंतर टेबल टेनिसपटू अंकुर भट्टाचार्जी म्हणाला की, “मला हवं तसं काम करता आलं याचा मला खरोखर आनंद आहे. लिलियन बार्डेटसारख्या बलाढ्य खेळाडूविरुद्ध 3-0 असा विजय मिळवणे खूप छान होते. मला सहसा जास्त विचार करायला आवडत नाही. मी एका वेळी एकच गेम घेतो आणि मला आनंद होतो की मी विजयी संघात आलो,” अंकुरने प्रभावी प्रदर्शनानंतर सांगितले.
अल्टिमेट टेबल टेनिस लीग आज पहिला सामना दबंग दिल्ली आणि यू मुंबा यांच्यामध्ये रंगणार आहे. यू मुंबाच्या संघामध्ये आकाश पाल, काव्यश्री बास्कर, मानव ठक्कर, स्पेनची मारिया जिओ, नायजेरियाचा कादरी अरुणा, सुतीर्थ मुखर्जी या खेळाडूंचा समावेश आहे. तर दबंग दिल्लीमध्ये ऑस्ट्रियाचा अँड्रियास लेवेन्को, दिया चितळे, लक्षिता नारंग, थायलंडची ओरवान परनांग, साथियान ज्ञानसेकरन, यशांश मलिक या खेळाडूंचा समावेश आहे.