Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पॅरिस ऑलिम्पिकसाठी जाणाऱ्या खेळाडूंमध्ये भारतीय जवानांचा समावेश; आर्मीचे ‘हे’ स्टार प्लेअर्स आणणार पदक

Paris Olympics 2024 Updates : भारतीय खेळाडू पॅरिस ऑलिम्पिकसाठी सज्ज झाले आहेत. परंतु, फार कमी लोकांना माहिती आहे की, ऑलिम्पिकमध्ये यश गाठण्यामध्ये भारतीय आर्मीचा मोठा सहभाग आहे. भारतीय सैन्य क्रीडा संवर्धनासाठी खूप काम करते. लष्कराशी संबंधित अनेक खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर पदके जिंकली आहेत.

  • By युवराज भगत
Updated On: Jul 16, 2024 | 07:01 PM
India's star javelin thrower Neeraj Chopra

India's star javelin thrower Neeraj Chopra

Follow Us
Close
Follow Us:

Who are The Players in Indian Army and Navy : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचा तिरंगा फडकवण्यासाठी भारतीय खेळाडू सज्ज झाले आहेत. भारतीय संघात असे काही खेळाडू आहेत, जे देशाचे रक्षण करतात आणि आता देशासाठी पदकही आणतील. भारतीय सैन्य नेहमीच खेळांना प्रोत्साहन देत आहे आणि या ऑलिम्पिकमध्येही हा ट्रेंड कायम आहे. आज आपण अशा खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत, जे देशासह भारतीय सैन्यालाही गौरव मिळवून देतील. आपल्याला फक्त नीरज चोप्राचे नाव माहिती आहे परंतु आणखी काही खेळाडू आहेत जे आपल्या कामगिरीने देशाचा गौैरव वाढवणार आहेत.

नीरज चोप्रा : भारताचा एकमेव सुवर्णपदक विजेता खेळाडू नीरज चोप्रा हा देखील लष्कराशी संबंधित आहे. नीरज २०१६ मध्ये सैन्यात दाखल झाला. तो राजपुताना रायफल्सचा भाग आहे. नीरज पूर्वी नायब सुभेदार पदावर होता, मात्र टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर त्याला बढती देऊन सुभेदार पद बहाल करण्यात आले. नीरजला परम विशेष सेवा पदक आणि विशिष्ठ पदक देखील मिळाले आहे.
अमित पंघाल : भारतीय बॉक्सर अमित पंघाल हा देखील लष्कराशी संबंधित आहेत. अमित २०१९ आशियाई खेळ आणि राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक विजेता आहे. अमित २०१८ साली सैन्यात दाखल झाला. तो महार रेजिमेंटच्या २२व्या बटालियनमध्ये सुभेदार पदावर कार्यरत आहेत. तो पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदकाचा प्रमुख दावेदार आहे.

अविनाश साबळे : भारताचा ३००० मीटर स्टीपलचेस धावपटू अविनाश साबळे १२वी उत्तीर्ण झाल्यानंतर सैन्यात सामील झाला. तो महार रेजिमेंटमध्ये कार्यरत आहे. २०१३-१४ मध्ये तो सियाचीनमध्ये तैनात होता. त्यानंतर तो राजस्थान आणि सिक्कीममध्येही तैनात होता. सध्या अविनाश साबळे नायब सुभेदार पदावर कार्यरत आहेत. त्याने स्टीपलचेस स्पर्धेत सुवर्णपदक आणि आशियाई गेम्स २०२२ मध्ये ५००० मीटर स्पर्धेत रौप्य पदक जिंकले आहे.

जॅस्मिन लॅम्बोरिया : भारतीय बॉक्सर जॅस्मिन लॅम्बोरियाने २०२२ च्या बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समध्ये कांस्यपदक जिंकले होते. या वर्षी ती सैन्यात दाखल झाली आहे. लष्कराशी संबंधित असलेली ती पहिली महिला बॉक्सर आहे. ती लष्करी पोलिसात हवालदार पदावर कार्यरत आहे.

तरुणदीप राय : भारतीय तिरंदाज तरुणदीप राय गेल्या २४ वर्षांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करत आहे. २००४ मध्ये अथेन्स ऑलिम्पिकमध्ये त्याने देशासाठी पदार्पण केले होते. त्यानी देशासाठी अनेक ऐतिहासिक पदके जिंकली आहेत. तरुणदीप गोरखा रायफल्समध्ये सुभेदार पदावर कार्यरत आहे. त्याला विशिष्ठ सेवा पदक प्रदान करण्यात आले आहे.

प्रवीण जाधव : भारतीय तिरंदाज प्रवीण जाधव दुसऱ्यांदा ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार आहे. तो लष्कराशीही संबंधित आहे. जाधव ८३ व्या आर्मर्ड रेजिमेंटमध्ये हवालदार पदावर कार्यरत आहे. गरीब कुटुंबातून आलेला प्रवीण जाधव सैन्यात दाखल झाल्यावर कुटुंबाला खूप आधार मिळाला.

मोहम्मद अनस याहिया : भारतीय खेळाडू मोहम्मद अनस याहिया हा पॅरिस ऑलिम्पिकसाठी निवडलेल्या ४x४०० मीटर पुरुष रिले संघाचा भाग आहे. अनस भारतीय नौदलाशी संबंधित आहे. अनसची भारतीय नौदलाच्या स्काऊटिंग टीमने निवड केली होती. भारतीय नौदलाने त्याच्या कारकिर्दीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

अरोकिया राजीव : भारतीय ॲथलीट अरोकिया राजीव पॅरिस ऑलिम्पिकमधील ४x४०० मीटर पुरुष रिले संघाचा भाग आहे. राजीवही लष्करात कार्यरत आहे. त्याने मद्रासच्या आठव्या रेजिमेंटमध्ये सुभेदार पद भूषवले आहे. अर्जुन पुरस्कार मिळवणारा तो त्याच्या रेजिमेंटमधील दुसरा खेळाडू आहे. भारताचे माजी फुटबॉलपटू हवालदार पीटर थंगराज हेही याच रेजिमेंटशी संबंधित होते.

 

Web Title: Indian soldiers included among athletes going to paris olympics 2024 these star players of army will bring medals 2

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2024 | 07:01 PM

Topics:  

  • indian Soldiers
  • Neeraj Chopra
  • Paris Olympics

संबंधित बातम्या

नीरज चोप्राची पत्नी हिमानीचा टेनिसला रामराम; १.५ कोटी रुपयांच्या नोकरीवरही सोडले पाणी, करणार ‘हा’ बिझनेस..
1

नीरज चोप्राची पत्नी हिमानीचा टेनिसला रामराम; १.५ कोटी रुपयांच्या नोकरीवरही सोडले पाणी, करणार ‘हा’ बिझनेस..

Neeraj Chopra चा अश्वमेध चौखूर, एक-एक साम्राज्य करतोय वश! ऑस्ट्राव्हा गोल्डन स्पाइक स्पर्धेचे विजेतेपद जिंकत रचला इतिहास.. 
2

Neeraj Chopra चा अश्वमेध चौखूर, एक-एक साम्राज्य करतोय वश! ऑस्ट्राव्हा गोल्डन स्पाइक स्पर्धेचे विजेतेपद जिंकत रचला इतिहास.. 

शेवटी वेबरला नीरज चोप्राने टाकलं मागे! गोल्डन बॉय Paris Diamond League चा चॅम्पियन
3

शेवटी वेबरला नीरज चोप्राने टाकलं मागे! गोल्डन बॉय Paris Diamond League चा चॅम्पियन

गोल्डन बॉय नीरज चोप्रा पुन्हा ॲक्शनमध्ये! येथे पाहू शकता मोफत लाईव्ह स्ट्रीमिंग
4

गोल्डन बॉय नीरज चोप्रा पुन्हा ॲक्शनमध्ये! येथे पाहू शकता मोफत लाईव्ह स्ट्रीमिंग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.