Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विश्वचषकापूर्वी भारतीय महिला संघाला मोठा झटका! वेदा कृष्णमूर्तीने केला क्रिकेटला अलविदा..

भारतीय महिला क्रिकेट संघाची अनुभवी फलंदाज वेदा कृष्णमूर्तीने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. तिने एकदिवसीय विश्वचषकाच्या दोन महिने आधीच क्रिकेटला राम राम केला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jul 26, 2025 | 03:31 PM
Big blow to Indian women's team before World Cup! Veda Krishnamurthy bids farewell to cricket..

Big blow to Indian women's team before World Cup! Veda Krishnamurthy bids farewell to cricket..

Follow Us
Close
Follow Us:

Veda Krishnamurthy announces retirement from cricket : भारतीय महिला क्रिकेट संघाची अनुभवी फलंदाज वेदा कृष्णमूर्तीने शुक्रवारी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. एकदिवसीय विश्वचषकाच्या दोन महिने आधीच वेदाने क्रिकेटला अलविदा म्हटले आहे. वेदा कृष्णमूर्तीने सोशल मीडियाद्वारे निवृत्तीची घोषणा जाहीर केली आहे.

वेदा कृष्णमूर्ती बऱ्याच काळापासून भारतीय संघाचा एक महत्वाचा भाग आहे. सोशल मीडियावर निवृत्तीची जाहीर करताना लिहिले की, “लहान शहरातील मुलगी असल्याने, माझा प्रवास कदूरच्या रस्त्यांपासून सुरू झाला आहे. जेव्हा मी पहिल्यांदा बॅट उचलली तेव्हा मला हा खेळ खूपच आवडला. मला माहित नव्हते की हा प्रवास मला कुठे घेऊन जाणार आहे. पण आज जेव्हा मी मागे वळून पाहतो तेव्हा मला अभिमान वाटतो की मी देशासाठी खेळली आहे.”

हेही वाचा : IND vs ENG : जसप्रीत बुमराह थांबता थांबेना! चौथ्या कसोटीत रचला इतिहास; इंग्लंडमध्ये ‘हा’ भीम पराक्रम करणारा तो पहिलाच..

वेदाने पुढे म्हटले आहे की, “क्रिकेट माझ्यासाठी फक्त एक खेळ नव्हता, तर तो माझी ओळख बनला आहे. त्याने मला जीवनातील आव्हानांशी लढायला शिकवले, पराभव स्वीकारायला आणि पुन्हा उभे राहण्यास शिकवले. आता या सुंदर अध्यायाला निरोप देण्याची वेळ येऊन ठेपली आहे.” यावेळी तिने बीसीसीआय, कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना (केएससीए), रेल्वे, कर्नाटक क्रिकेट संस्था (केआयओसी), तिचे प्रशिक्षक, पालक आणि कुटुंब यांचे आभार मानलेन आहेत. ज्यांनी तिला प्रत्येक पावलावर साथ आणि पाठिंबा दिलाया आहे.

From a small-town girl with big dreams to wearing the India jersey with pride.
Grateful for everything cricket gave me the lessons, the people, the memories.
It’s time to say goodbye to playing, but not to the game.
Always for India. Always for the team. 🇮🇳 pic.twitter.com/okRdjYuW2R

— Veda Krishnamurthy (@vedakmurthy08) July 25, 2025

सहकाऱ्यांबद्दल नेमकं काय म्हटली?

वेदाने तिच्या सहकाऱ्यांबद्दल लिहिले की, “आम्ही एकत्र अनेक संस्मरणीय क्षण सोबत घालवले आहेत. विजयाचा आनंद, पराभवाचा धडा आणि खूप मजा देखील केली आहे. तुम्ही फक्त सहकारी खेळाडू नव्हतात, तर माझ्या कुटुंबासारखेच होता” वेदा कृष्णमूर्तीने स्थानिक पातळीवर खेळताना कर्नाटक आणि रेल्वेचे नेतृत्व केले आहे. यासोबत तिने दोन्ही संघांसाठी उत्कृष्ट कामगिरी देखील केली आहे. तिने लिहिले की या संघांचे नेतृत्व करणे माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट राहिली आहे. या अनुभवाने मला एक चांगला खेळाडू आणि माणूस बनवले असल्याचे वेदाने म्हटले आहे.

हेही वाचा : IND vs ENG Test : अचानक संघात स्थान मिळाल्यानंतर खेळाडूला विश्वास बसेना…निवड झाल्याबद्दल जगदीशनने सोडले मौन!

वेदा कृष्णमूर्तीची क्रिकेट कारकीर्द

आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत, वेदाने भारतासाठी ४८ एकदिवसीय सामने खेळले आहेत. ज्यामध्ये तिने ८२९ धावा फटकावल्या आहेत. यामध्ये तिने ८ अर्धशतके झळकावली आहेत. तिची ७१ ही सर्वोच्च धावसंख्या राहिली आहे. याशिवाय, तिने ७६ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ८७५ धावा काढल्या आहेत. ज्यामध्ये तिने २ अर्धशतके लगावली आहेत. ती २०१७ च्या महिला एकदिवसीय विश्वचषक आणि २०२० च्या महिला टी-२० विश्वचषकाच्या उपविजेत्या भारतीय संघाचा भाग राहिली आहे.

 

Web Title: Indian womens teams veda krishnamurthy retires from cricket before world cup

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2025 | 03:31 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.