Asian Athletics Championships: India's dominance continues! Gulveer Singh's 'double golden explosion', Pooja Singh's golden jump..
Asian Athletics Championships : आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी करून दाखवलीये. दक्षिण कोरियातील गुमी येथे सुरु असलेल्या स्पर्धेतील चौथ्या दिवसाअखेर भारत ८ सुवर्ण, ७ रौप्य आणि ३ कांस्य पदकासह पदकतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. आशियाई अॅकथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२५ मध्ये भारतीय खेळाडूंचा ट्रॅकवर दबदबा पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे. आधी १०,००० मीटर शर्यतीत दमदार कामगिरी करत सुवर्ण जिंकणाऱ्या गुलवीरने आता ५,००० मीटर शर्यतीतही जोरदार मुसंडी मारत दुसरे सुवर्णपदक पटकावले.
आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२५ मध्ये भारताचे पदकाचे खाते गुलवीर सिंहने यानेच उघडले होते. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी त्याने पुरुषांच्या १०,००० मीटर शर्यतीत सूर्वणपदक जिंकले होते. त्याने ५००० मीटर शर्यतीचेही सुवर्ण नावावर केले. त्याने पिछाडीवरून जोरदार मुसंडी मारताना हे पदक जिंकून इतिहास घडवला. त्याचवेळी महिलांच्या ३००० मीटर स्टीपलचेस शर्यतीत पारुल चौधरीने राष्ट्रीय विक्रमासह रौप्यपदकाची कमाई केली.
हेही वाचा : ENG vs WI : पहिल्या एकदिवसीय सामन्यात ब्रिटिशांचा ४०० धावांचा डोंगर, इंग्लंडकडून विंडीजचा २३८ धावांनी पराभव…
गुलवीर हा हरि चंद (१९७५) आणि जी लक्ष्मणन (२०१७) यांच्यानंतर आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत पुरुषांच्या १०,००० मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकणारा गुलवीर हा तिसरा भारतीय ठरला होता. त्याने २८:३८.६३ वेळ नोंदवत सुवर्णपदक नावावर केले होते. २०२३ मधील आशियाई स्पर्धेत त्याने ५००० मीटर शर्यतीत कांस्यपदक जिंकले होते. आता त्याने या कांस्यचे रुपांतर सुवर्णपदकात केले. गुरवीरने १३ मिनिटे २४.७७सेकंदाची वेळ नोंदवरून थायलंडच्या किएरान टुंनिवाटे (१३ मिनिटे २४.९७ सेकंद) आणि जपानच्या नागिया मोरी (१३ मिनिटे २५ सेकंद) यांना मागे टाकून पहिला क्रमांक पटकावला. याच शर्यतीत भारताचा अभिषेक पाल १३ मिनिटे ३३.५१ सेकंदासह सहावा आला.
एकाच आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत ५००० मीटर आणि १०००० मीटर धावण्याच्या शर्यतीत दुहेरी सुवर्णपदक जिंकणारा गुलवीर सिंग हा इतिहासातील दुसरा भारतीय ठरला आहे.
हेही वाचा : MI vs GT : ‘हिटमॅन’ ची गाडी सुसाट! IPL प्लेऑफमध्ये Rohit Sharma ने रचला इतिहास; मोडला स्वतःचाच विक्रम..
महिला गटात पूजा सिंग हिने एतिहासिक कामगिरी नोंदवलीये. उंच उडी प्रकारात तिने १.८९ मीटर उंचउडी मारत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. या स्पर्धेत सुवर्ण पटकवणारी ती दुसरी भारतीय महिला ठरलीये. तिच्या आधी बॉबी अलॉयसियस हिने आशियाई चॅम्पियनशिपमध्ये उंच उडीत पदक जिंकले होते. बॉबीने २००० मध्ये सुवर्ण आणि २००२ मध्ये रौप्यपदकाला गवसणी घातली होती. नंदिनी आगासरा हिने हेप्टॅथलॉन स्पर्धेत सुवर्ण कामगिरी करुन दाखवलीये. या क्रीडा प्रकारात स्वप्ना बर्मन आणि सोमा बिस्वास यांच्यानंतर सुवर्ण पदक जिंकणारी ती तिसरी भारतीय ठरली.