फोटो सौजन्य - MMA सोशल मीडिया
MMA फायटर अंगद बिष्ट : भारताचा MMA फायटर अंगद बिष्ट सध्या अल्टिमेट फायटिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करत आहे. त्याने त्याच्या Road To UFC च्या पहिल्या सामन्यामध्ये त्याने समोरील प्रतिस्पर्धीला तीन मिनिटामध्ये नॉकआऊट करून सामना जिंकला होता. त्याने आता Road To UFC च्या सेमी फायनल,मध्ये प्रवेश केला आहे. रोड टू यूएफसी सिझन ३ च्या सेमीफायनलमध्ये सेमीफायनल, फ्लायवेट, बँटमवेट, फेदरवेट आणि महिला स्ट्रॉवेट विभागातील अव्वल स्थानावरील फायटर असणार आहेत. या सेमीफायनलचे आयोजन २४ ऑगस्ट रोजी करण्यात आले आहे. यामध्ये भारताचा या मिश्र मार्शल आर्ट्स फायनल अंगद बिष्टचा समावेश असणार आहे.
भारताचा MMA फायटर अंगद बिष्ट आतापर्यत त्याने १० विजय मिळवले आहेत आणि ३ पराभव स्वीकारले आहेत. अंगद बिष्ट हा भारतामधील सर्वात उज्ज्वल फायटरमधील एक आहे.
Road To UFC सेमीफायनलमधील सामान्यांचे आयोजन २४ ऑगस्ट रोजी करण्यात आले आहे. अंगद बिष्टचा सामना भारतीय वेळेनुसार ८:३० AM वाजता पाहता येणार आहे. भारतामध्ये या सामन्याचे थेट प्रसारण सोनी स्पोर्ट्स नेटवर्क (Sony Sports Network) वर दिसणार आहे. त्याचबरोबर टेलिव्हिजनवर पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी हे सामने सोनी स्पोर्ट्स TEN 2 (इंग्रजी), सोनी स्पोर्ट्स TEN 3 (हिंदी) आणि Sony Sports TEN 4 (तमिळ/तेलुगु) वर दाखवले जाणार आहेत. त्याचबरोबर मोबाईलवर पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी या सामन्याची लाईव्ह स्ट्रीमिंग सोनी लिव्ह (Sony LIV) वर पाहता येणार आहे. परंतु त्यासाठी ज्या प्रेक्षकांकडे सब्स्क्रिबशन असेल त्यांनाच पाहता येणार आहे.