आयपीएल 2025 : पंजाब, गुजरात लखनौचे पैसे सह! प्लेफॅफ ग्रुप ग्रुप, 'या' ऑरो नवीन तुम्हाला दरम्यान मात लॉटरी.
IPL 2025 : आयपीएल 2025 हंगामातील उर्वरित सामने पुन्हा 17 मे पासून सुरू होणार आहेत. भारत-पाकिस्तान तणावामुळे बीसीसीआयनकडून 9 मे रोजी ही स्पर्धा एक आठवड्यासाठी पुढे ढकलली होती. आता आयपीएल स्पर्धा पुन्हा सुरू होत आहे. परंतु आता आयपीएलच्या प्रत्येक संघाला आपल्या संघात बदल करावे लागत आहेत. काही संघाचे परदेशी खेळाडू आपल्या मायदेशी परतले आहेत तर तर काहींना दुखापतींनी ग्रासले आहे. त्यामुळे आता पुढील हंगाम खेळताना अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.
लखनौ सुपर जायंट्सला मोठा झटका बसला आहे. कारण, त्यांचा युवा वेगवान गोलंदाज मयंक यादव पुन्हा एकदा दुखापतग्रस्त झाला आहे. तो आता थेट स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्याच वेळी, पंजाब किंग्जमध्ये एका नवीन खेळाडूचची एंट्री झाली आहे. हा खेळाडू म्हणजे न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काइल जेमीसनया आहे. जो 4 वर्षांनंतर लीगमध्ये खेळताना दिसणार आहे, त्याला 2 कोटी रुपये किमीत करारबद्ध करण्यात आले आहे. स्पर्धा पुन्हा सुरू होण्याच्या48 तास आधीच, म्हणजे गुरुवार, 15 मे रोजी आयपीएलने एका प्रेस प्रसिद्ध करत ही माहिती दिलीया आहे.
एलएसजीचा वेगवान गोलंदाज मयंक यादवला पाठीच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर जावे लागले आहे. यामुळे लखनौ तसेच मयंकसाठी देखील अडचणी वाढल्या आहेत. कारण, गेल्या वर्षीही तो फक्त 4 सामने खेळल्यानंतर त्याला दुखापतीमुळे बाहेर जावे लागले होते. यानंतर, चालू हंगामात देखील तो लखनौच्या पहिल्या 9 सामन्यांना मुकल्यानंतर परतला होता आणि केवळ 2 सामनेच त्याला खेळता आले.
अशा वेळी आता लखनौ सुपर जायंट्सने मयंकच्या जागी न्यूझीलंडचा युवा वेगवान गोलंदाज विल ओ’रोर्कचा आपल्या संघात समावेश केला आहे. उंच ओ’रोर्कला हंगामातील उर्वरित सामन्यांसाठी 3 कोटी रुपये मिळणार आहेत. आयपीएलमध्ये किवी वेगवान गोलंदाजाचा हा पहिलाच अनुभव असणार आहे. मेगा लिलावात त्याला कोणीही खरेदीदार मिळाला नव्हता. लिलावापूर्वी, त्याने भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत शानदार प्रदर्शन केले होते आणि संघाच्या ऐतिहासिक क्लीन स्वीपमध्ये मोठी भूमिका बजावली होती.
हेही वाचा : भारतीय संघातील सर्वात आळशी खेळाडू कोण? माहितीय का?, खुद्द Yuvraj Singh नेच केला मोठा गौप्यस्फोट..
लखनौच नाही तर पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स या संघांनी देखील बदली खेळाडूंची घोषणा केली आहे. प्लेऑफच्या शर्यतीत प्रबळ दावेदार असणाऱ्या शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सला त्यांचा स्टार इंग्लिश फलंदाज जोस बटलरशिवाय पुढे जावे लागणाराहे. बटलर सध्या परतत असला तरी तो लीग स्टेज सामन्यांनंतर तो उपलब्ध असणार नाही. अशा परिस्थितीत, गुजरातने प्लेऑफसाठी श्रीलंकेचा यष्टीरक्षक फलंदाज कुसल मेंडिसला आपल्या संघात सामील करून घेतले आहे. त्याला 75 लाख रुपयांना करारबद्ध करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.