IPL 2025: Jackpot of happiness for these 3 teams even before IPL; 5 strong players will return..
IPL 2025 : नुकताच चॅम्पियन ट्रॉफीचा थरार संपला आहे. आता क्रिकेटप्रेमींना आयपीएल 2025 चे वेध लागले आहे. आयपीएल 2025 चा 18 वा हंगाम 22 मार्चपासून सुरू होत आहे. आयपीएल सुरू होण्यापूर्वीच 3 संघांसाठी मोठी आनंदनाची बातमी समोर आली आहे. वास्तविक, मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्सचे 5 स्टार खेळाडू दुखापतीने त्रासले होते. परंतु आता ते पुनरागमन करणार असल्याचे समोर आले आहे. हे खेळाडू आता केवळ बीसीसीआयच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीकडून मंजुरीची मिळण्याची वाट पाहत आहे.
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार स्टार खेळाडू संजू सॅमसन आहे. इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेदरम्यान त्याच्या बोटाला दुखापत झाली होती. यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मिळालेल्या अहवालानुसार, त्याने फलंदाजीसाठी फिटनेस चाचणी पास केली असून लवकरच त्याला सोडण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. मात्र, एनसीए अजूनही त्याच्या विकेटकीपिंगवर लक्ष ठेवून आहे. 23 मार्च रोजी राजस्थान रॉयल्सच्या सलामीचा सामाना आहे. या सामन्याच्या दोन दिवस आधी आणखी काही चाचण्या घेतल्या जाण्याची शक्यता आहे. त्यांनंतर त्याला फलंदाजीसाठी मंजुरी देण्यात येण्याची शक्यता हे. मात्र त्याला जर मंजूरी मिळाली नाही तर त्याच्या जागी ध्रुव जुरेल विकेटकीपिंग करेल.
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीवेळी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात जसप्रीत बुमराहला दुखापत झाली होती. सिडनी कसोटीपासून तो संघाच्या बाहेरच आहे. दुखापतीमुळे त्याला चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत देखील खेळता आलेले नाही. मात्र आता संपूर्ण लक्ष आयपीएल 2025 वर असणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तो सध्या बेंगळुरूमध्ये पुनर्वसन सुरू आहे. बुमराह या महिन्याच्या अखेरीस ठीक होणार आहे. त्याच्या संघात परतण्याने मुंबई इंडियन्सला मोठा दिलासा मिळणार आहे.
हेही वाचा : Varun Chakravarthy : विमानतळावरून पाठलाग अन् धमकीचे कॉल्स; मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्तीचे ‘ते’ भयानक दिवस…
लखनौ सुपर जायंट्सचे 3 स्टार वेगवान गोलंदाज दुखापतीचा सामना करत आहेत. यामध्ये वेगवान गोलंदाज मयंक यादव, मोहसीन खान आणि आवेश खान यांची नावे आहेत. मयंकही पाठीच्या दुखापतीने त्रस्त आहे. तो ऑक्टोबर 2024 पासून मैदानापासून लांब आहे. आवेश गुडघ्याच्या कार्टिलेजचे पुनर्वसन करत आहे. रणजी ट्रॉफीदरम्यान त्याला दुखापत झाली होती. यानंतर त्याला एनसीएमध्ये पाठवण्यात आले होते.
हेही वाचा :WPL 2025 च्या विजेत्या संघाचे भरणार खिसे, घरी घेऊन जाणार करोडो रुपये, पराभूत संघही होणार श्रीमंत
तसेच मोहसीन खान देखील दुखापतीतून सावरत आहे. त्याच्या दुखापतीबाबत जास्त माहिती मिळू शकलेली नाही. त्याने 31 डिसेंबर रोजी विजय हजारे ट्रॉफीमध्ये शेवटचा सामना खेळला होता. तेव्हापासून तो बाहेरच आहे. अहवालानुसार, या 3 पैकी किमान 2 गोलंदाजांना क्लिअरन्स मिळणे अपेक्षित आहे.