गुजरात अन् दिल्लीचा सामना फिक्सिंगचा बळी? (फोटो -सोशल मिडिया)
दिल्ली कॅपिटल्सचा 1 रन्सने गुजरातने केला पराभव
कालचा सामन्यात फिक्सिंग झाल्याची चर्चा
सोशल मिडियावर चर्चांना उधाण
GT Vs DC Updates in IPL: काल दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स (IPL)यांच्यात सामना पार पडला. अटीतटीच्या सामन्यात गुजरात टायटन्सने 1 रन्सने दिल्लीवर विजय मिळवला आहे. मात्र शेवटच्या डेव्हिड मिलरच्या चुकीमुळे दिल्लीचा परभव झाला. डेव्हिड मिलर चांगली खेळी करत असताना शेवटच्या 2 चेंडूवर तो धावा करू शकला नाही. त्यामुळे हा सामना फिक्सिंग असल्याच्या चर्चा आता जोर धरू लागल्या आहेत.
19 व्या ओव्हरमध्ये डेव्हिड मिलरने मारलेला फटका सिक्स होता असे म्हंटले जात आहे. मात्र सामन्यात तो शॉट चौकार म्हणून देण्यात आला होता. 10 व्या ओव्हर्सच्या 1 ल्या चेंडूवर वाद निर्माण झाला आहे. त्याने मारलेला शॉट सिक्स असून देखील चौकार दिला गेला असा हा वाद निर्माण झाला आहे.
शेवटच्या चेंडूवरून निर्माण झाला वाद
डेव्हिड मिलरने 19.5 या चेंडूवर बॅटला चेंडू लागलेला असून धाव घेतली नाही. शेवटच्या चेंडूवर 2 रन्सची गरज आतसणा त्याला शॉट मारता आला नाही. मात्र यामध्ये कुलदीप यादव रनआउट झाला. 5 व्या चेंडूवर डेव्हिड मिलरने रन न घेणे हा फिक्सिंगचा भाग असल्याचे म्हटले जात आहे. तर शेवटच्या चेंडूवर कुलदीप यावड रनआउट झाला. त्याबाबत देखील शंका उपस्थित केली जात आहे. तो रनआउट अनेक बाजूनी दाखवला जाणे अपेक्षित होते. कुलदीप यादव रनआउट झाला होता.
🚨IPL UNDER SCANNER: GT vs DC MATCH FIXING QUESTIONS 🚨 In the 19th over, David Miller hit one that looked like a clean six, but it was quickly given as four. No replay shown raising serious doubts. With just 2 needed off 2 balls, Miller refused an easy single. A shocking call… pic.twitter.com/arc65dX1LF — Muffatball vikrant (@Vikrant_1589) April 9, 2026
मिलरने केला दिल्लीचाच ‘गेम’
गुजरात टायटन्सने दिलेल्या 211 रन्सचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सकडून केएल राहुल आणि पथूम निसांका सलामीला मैदानात खेळण्यासाठी आले. त्यांनी पॉवरप्लेमध्ये एकही विकेट न गमावता 63 धावांची जोरदार खेळी केली. पथूम निसांका 41 रन्स करून आउट झाला. नितीश राणा तिसऱ्या सामन्यात देखील चांगली कामगिरी करू शकला नाही. केवळ 5 रन्स करून तो आउट झाला. तर गेल्या दोन सामन्यात चमकलेला समीर रीझवी एकही रन न करता आउट झाला. कर्णधार अक्षर पटेल 2 रन्स करून आउट झाला. केएल राहुल 92 रन्स करून आउट झाला.
DC Vs GT: मिलरने केला दिल्लीचाच ‘गेम’; ‘त्या’ एका चुकीमुळे कॅपिटल्सचा 1 रन्सने दारुण पराभव
त्यानंतर डेव्हिड मिलरने आपल्या हातात खेळाची सूत्रे घेतली. मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये 2 चेंडूत 2 धावांची गरज असताना त्याने मारलेल्या चेंडूवर धाव न घेणे ही चूक दिल्लीला महागात पडली. कारण शेवटच्या चेंडूवर 2 धावांची गरज असताना मिलरच्या बॅटला बॉल लागला नाही. त्यानंतर मागे उभा असलेल्या जोस बटलरने अचूक निशाणा लावून कुलदीप यादवला धावबाद केले. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सने जवळपास जिंकलेला सामना एका धावेने पराभव स्वीकारावा लागला.






