GT Vs DC Live Streaming (फोटो- ians)
गुजरात टायटन्सने दिल्लीला दिले 211 रन्सचे टार्गेट
शुभमन गिल, जोस बटलरची वादळी खेळी
दिल्लीच्या ओपनर्सची शानदार सुरुवात
Tata IPL 2026 GT Vs DC Live Results: आयपीएलचा थरार सुरू झाला आहे. चाहत्यांना रोज नवनवीन रेकॉर्ड, अटीतटीचा सामना पाहायला मिळत आहे. आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात मॅच झाली. प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सने दिल्ली कॅपिटल्सला 211 रन्सचे टार्गेट दिले होते. अखेर या सामन्यात गुजरात टायटन्सने दिल्ली कॅपिटल्सचा 1 रनने पराभव केला आहे.
दिल्ली कॅपिटल्सची फलंदाजी
गुजरात टायटन्सने दिलेल्या 211 रन्सचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सकडून केएल राहुल आणि पथूम निसांका सलामीला मैदानात खेळण्यासाठी आले. त्यांनी पॉवरप्लेमध्ये एकही विकेट न गमावता 63 धावांची जोरदार खेळी केली. पथूम निसांका 41 रन्स करून आउट झाला. नितीश राणा तिसऱ्या सामन्यात देखील चांगली कामगिरी करू शकला नाही. केवळ 5 रन्स करून तो आउट झाला. तर गेल्या दोन सामन्यात चमकलेला समीर रीझवी एकही रन न करता आउट झाला. कर्णधार अक्षर पटेल 2 रन्स करून आउट झाला. केएल राहुल 92 रन्स करून आउट झाला.
Match 14. WICKET! 19.6: Kuldeep Yadav 1(1) Run Out Jos Buttler, Delhi Capitals 209/8 https://t.co/oOdPR1oSeP #TATAIPL | #DCvGT — IndianPremierLeague (@IPL) April 8, 2026
त्यानंतर डेव्हिड मिलरने आपल्या हातात खेळाची सूत्रे घेतली. मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये 2 चेंडूत 2 धावांची गरज असताना त्याने मारलेल्या चेंडूवर धाव न घेणे ही चूक दिल्लीला महागात पडली. कारण शेवटच्या चेंडूवर 2 धावांची गरज असताना मिलरच्या बॅटला बॉल लागला नाही. त्यानंतर मागे उभा असलेल्या जोस बटलरने अचूक निशाणा लावून कुलदीप यादवला धावबाद केले. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सने जवळपास जिंकलेला सामना एका धावेने पराभव स्वीकारावा लागला.
गुजरात टायटन्सची फलंदाजी
गुजरात टायटन्सकडून फलंदाजीची सुरुवात करण्यासाठी सलामीला कर्णधार शुभमन गिल आणि डावखुरा फलंदाज साई सुदर्शन मैदानात उतरले. साई सुदर्शन 12 रन्स करून आउट झाला. मागील सामन्यातील कामगिरीचे सातत्य त्याला या सामन्यात राखता आले नाही. त्यानंतर जोस बटलर खेळण्यासाठी आला. त्याने 24 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. जोस बटलर 27 चेंडूत 52 रन्स आउट झाला.
बटलर आउट झाल्यावर वॉशिंग्टन सुंदर खेळण्यासाठी आला. कर्णधार शुभमन गिलने 34 चेंडूत 51 रन्सची अर्धशतकी तुफानी खेळी केली. शुभमन गिलने 45 चेंडूत 70 रन्सची तुफानी खेळी केली. राहुल तेवतीयाने 1 तर ग्लेन फिलिप्सने 14 रन्स केल्या. तर वॉशिंग्टन सुंदरने 55 रन्सची जोरदार अर्धशतकी खेळी केली. डेव्हिड मिलर रिटायर्ड हर्ट झाला. त्याने 12 रन्स केल्या,
GT Vs DC Live: शुभमनची ‘किलींग’ खेळी’; गोलंदाजांची धुलाई, दिल्लीला जिंकण्यासाठी 211 धावांची गरज
गुजरात टायटन्सची गोलंदाजी
गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांना पॉवर प्ले मध्ये एकही विकेट मिळवता आली नाही. राशीद खानने समीर रिझवी आणि नितीश राणा यांना आउट केले. गुजरात टायटन्सला गरज असताना राशीद खानने या दोन महत्वाच्या विकेट पटकावल्या. राशीद खानने कर्णधार अक्षर पटेलची विकेट घेतली. मोहम्मद सिराजने 1 विकेट घेतली. तर प्रसिद्ध कृष्णाने महत्वाच्या अशा 2 विकेट्स पटकावल्या.
दिल्ली कॅपिटल्सची गोलंदाजी
टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय कर्णधार अक्षर पटेलने घेतला. दरम्यान मुकेश कुमारने फॉर्ममध्ये असणाऱ्या साई सुदर्शनला 12 रन्सवर आउट केले. गुगली बॉलिंगसाठी ओळखल्या जाणाऱ्या कुलदीप यादवने जोस बटलरची विकेट घेतली. शुभमन गिल, वॉशिंग्टन सुंदर, जोस बटलरने दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. मुकेश कुमारने 4 ओव्हर्समध्ये 55 रन्स देऊन 2 विकेट्स घेतल्या. तर लुंगी एनगीडीने 4 ओव्हर्समध्ये 24 रन्स देऊन एक विकेट घेतली.
DC Vs GT Pitch Report: मैदान तयार, खेळाडू सज्ज, पण…; पाऊस गेम करणार, पहा पीच रिपोर्ट
गुजरात टायटन्सची संभाव्य टीम: शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जोस बटलर (यष्टिरक्षक), ग्लेन फिलिप्स, वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, शाहरुख खान, राशिद खान, कगिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा
दिल्ली कॅपिटल्सची संभाव्य टीम: अक्षर पटेल (कर्णधार), समीर रिझवी, टिम डेविड, जॅक फ्रेझर-मॅकगर्क, जितेश शर्मा (यष्टिरक्षक), कृणाल पंड्या, मार्कस स्टॉइनिस, वरुण चक्रवर्ती, हर्षल पटेल, मुकेश कुमार






