IPL 2027 Auction: 66 जागा अन् 1220 दावेदार! IPL 2027 ऑक्शनमध्ये पैशांचा पाऊस पडणार; कोणत्या खेळाडूंचं नशीब चमकणार?

IPL 2027 Auction 1220 Players Register for 66 Slots: आयपीएल २०२७ मिनी ऑक्शनसाठी १४ आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या भारतीय खेळाडूंसह एकूण १,२२० खेळाडूंनी नोंदणी केली आहे.
photo- social media
IPL 2027 AuctionIPL 2027 Auction 1220 Players Register
Published on: 
Updated on: 
  • आयपीएलच्या लिलावात कोण मारणार बाजी?

  • ६६ जागांसाठी १२२० खेळाडूंची शर्यत

  • १४ भारतीय स्टार्सवर लागणार बोली

IPL 2027 Auction: आयपीएल २०२७ आधी सर्व फ्रेंचायझी मिनी लिलावासाठी सज्ज झाले आहे. १६ डिसेंबर रोजी गोवा येथे हा लिलाव पार पडणार आहे. याआधी सर्व संघानी रिटेन ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. तसेच,अनेक खेळाडूंना संघातून रिलीज करण्यात आले आहे. दरम्यान, या लिलावासाठी १,२२० खेळाडूंनी नोंदणी केली आहे. यामध्ये फक्त १४ आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. विशेष म्हणजे, बेन स्टोक्सनेही या लिलावासाठी नोंदणी केली आहे.

आयपीएल लिलावासाठी खेळाडूंची केली नोंदणी

मीडिया रिपोर्ट्सनुसार,आयपीएल २०२७ च्या लिलावासाठी एकूण १,२२० खेळाडूंनी नोंदणी केली आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या १४ भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. तर, १७० आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या विदेशी खेळाडूंचाही समावेश आहे.

आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या भारतीय खेळाडूंच्या यादीत करुण नायर, आवेश खान, तुषार देशपांडे, दीपक चहर, आकाश दीप, जयदेव उनाडकट आणि उमेश यादव यासारख्या स्टार खेळाडूंचा समावेश आहे. त्यामुळे या सर्व खेळांडूवर सगळ्यांच्या नजरा असतील.

  • लिलावासाठी खेळाडूंची यादी

  • एकूण खेळाडू: १२२०

  • कॅप्ड भारतीय खेळाडू १४

  • अनकॅप्ड भारतीय खेळाडू : ९२५

  • कॅप्ड आंतरराष्ट्रीय खेळाडू : १७०

  • अनकॅप्ड आंतरराष्ट्रीय खेळाडू: ६९

  • असोसिएट नेशन्स खेळाडू : ४२

photo- social media
Priyansh Arya : प्रियांश आर्यने रचला इतिहास, भारताच्या वतीने टी-20 मध्ये सर्वात मोठी खेळी करणारा ठरला फलंदाज

१८४ कॅप्ड खेळाडूंसोबतच, ४२ असोसिएट खेळाडूंनाही या लिलावात स्थान मिळाले आहे. याशिवाय, जपानचे बेंजामिन इटो-डेव्हिस आणि चार्ली हारा-हानजी यांनीही लिलावात आपला सहभाग नोंदवला आहे. आयपीएल २०२६ पूर्वी, बीसीसीआयच्या आदेशानुसार कोलकाता नाईट रायडर्सने मुस्तफिजुर रहमानला संघातून रिलीज केले होते. यामुळे भारत-बांग्लादेश क्रिकेट संबंधांमध्ये दुरावा निर्माण झाला. असे असूनही, आयपीएल २०२७ च्या लिलावासाठी एकूण ११ बांग्लादेशी खेळाडूंनी नोंदणी केली आहे.

लिलावापूर्वी सिलेक्टेड खेळाडूंची यादी तयार होणार

इंडियन प्रीमियर लीगच्या पुढील हंगामापूर्वी होणाऱ्या मिनी लिलावासाठी १,२२० खेळाडूंनी नोंदणी केली असली तरी, सर्वच खेळाडू यासाठी पात्र नसतील. लिलावाआधी फ्रेंचायझींना या खेळाडूंची संपूर्ण यादी दिली जाईल. केवळ तेच खेळाडू पात्र ठरतील ज्यांच्यामध्ये संघ रस दाखवतील. दरम्यान १,२२० खेळाडूंमधून अंदाजे २५०-३०० खेळाडू निवडले जातील. लिलावात बोली लागणाऱ्या खेळाडूंची यादी १ डिसेंबरपर्यंत जाहीर केली जाईल. हा लिलाव १६ डिसेंबर रोजी गोव्यात होणार असून, फ्रँचायझी आपले संघ मजबूत करण्याच्या उद्देशाने यात सहभागी होतील.

photo- social media
Vaibhav Sooryanvanshi: ६ संघाच्या एकत्रित सिक्स वैभवच्या नावे, पाकिस्तानची तंतरली; वैभव सूर्यवंशीची दहशत