Rinku Singh ला लग्नाचे गिफ्ट मिळणार! KKR 'ही' जबाबदारी देणार? इरफान पठाणच्या विधानाने वाढली उत्सुकता

Rinku Singh: केकेआरने आतापर्यंत आयपीएलमध्ये तीन वेळेस विजेतेपद पटकावले आहे. सध्या केकेआरकडे कर्णधारपदासाठी कमी पर्याय असल्याचे म्हटले जात आहे.
रिंकू सिंग केकेआरचा कर्णधार होण्याची शक्यता
रिंकू सिंग (फोटो- ians)
Published on: 
Updated on: 
  • रिंकू सिंग केकेआरचा कर्णधार होण्याची शक्यता

  • इरफान पठाणच्या विधानाने चर्चेला उधाण

  • अजिंक्य रहाणेने निवृत्ती घेतल्याने चर्चा

Rinku Singh: आयपीएल 2027 च्या आधी सर्व संघांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. कालच मुंबई इंडियन्सने रोहित शर्माची कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे. आता त्यानंतर कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार देखील बदलला जाऊ शकतो अशी चर्चा सुरू झाली आहे. याला कारण ठरले आहे ते म्हणजे इरफान पठाणचे विधान. रिंकू सिंग केकेआरचा नवा कर्णधार होण्याशी शक्यता वर्तवली जात आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू आणि वेगवान गोलंदाज इरफान पठाण याने रिंकू सिंगची कोलकाता नाइट रायडर्सच्या कर्णधारपदी नियुक्ती होण्याची शक्यता वर्तवली आहे. केकेआरने आतापर्यंत आयपीएलमध्ये तीन वेळेस विजेतेपद पटकावले आहे. सध्या केकेआरकडे कर्णधारपदासाठी कमी पर्याय असल्याचे म्हटले जात आहे.

Rinku Singh Wedding: शुभमंगल सावधान! भारताचा स्टार खेळाडू अडकणार विवाहबंधनात, कुठे आणि केव्हा होणार लग्न?

केकेआरचा कर्णधार असलेल्या अजिंक्य रहाणेने क्रिकेटच्या सर्व फॉर्मटधुन निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे आता केकेआर नव्या कर्णधाराच्या शोधत आहे. यामध्ये इरफान पठाणने वेस्ट इंडिजचा कर्णधार शाई होप याच्या नावाचाही उल्लेख केला आहे. 16 डिसेंबर रोजी गोवा येथे होणाऱ्या लिलावानंतर केकेआर आपल्या नव्या कर्णधारांची घोषणा करण्याची शक्यता आहे.

इरफान पठाणने 'जिओ हॉटस्टारशी' बोलताना 'रिंकू सिंगला कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार बनवण्याबाबत बरीच चर्चा सुरू आहे. सध्या त्यांच्या संघात कर्णधारपदासाठी फारसे पर्याय उपलब्ध नाहीत. अशा परिस्थितीत रिंकू हा सर्वात योग्य पर्याय वाटतो. ते लिलावातूनही एखाद्या कर्णधाराला खरेदी करण्याचा विचार करू शकतात. असे झाल्यास, मनात केवळ एकाच खेळाडूचे नाव येते – शाई होप.' असे विधान केले आहे.

टीम इंडियात मोठा बदल, Rising Stars Asia Cup मधून Rajat Patidar ची माघार; रिंकू सिंगकडे उपकर्णधारपदाची धुरा

केकेआरने ज्या खेळाडूंना रिलीज केले आहे त्यामध्ये काही वावगे वाटण्यासारखे नाही. अजिंक्य रहाणेच्या अनुपस्थितीत,अंगकृष रघुवंशी ओपन करू शकतो. हर्षित राणा आता गोलंदाजीसाठी पूर्णपणे तंदुरुस्त झाला असून, यामुळे संघाची ताकद वाढणार आहे. त्या दृष्टीने केकेआरला एक चांगले नेतृत्व प्राप्त झाले तर संघाची कामगिरी देखील चांगली होण्याची शक्यता वाढली आहे.

बातमी सोर्स - IANS 

Q

आयपीएल २०२७ मध्ये कोलकाता नाइट रायडर्सचा नवा कर्णधार कोण होऊ शकतो?

A

रिंकू सिंगला संघाचे नवे कर्णधारपद मिळू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Q

रिंकू सिंगच्या कर्णधारपदाच्या चर्चेला सुरुवात कशी झाली?

A

भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाण याच्या विधानानंतर रिंकू सिंग केकेआरचा नवा कर्णधार होऊ शकतो, अशी चर्चा क्रिकेटविश्वात सुरू झाली आहे.

रिंकू सिंग केकेआरचा कर्णधार होण्याची शक्यता
Rinku Singh Wedding: शुभमंगल सावधान! भारताचा स्टार खेळाडू अडकणार विवाहबंधनात, कुठे आणि केव्हा होणार लग्न?