रिंकू सिंग अडकणार विवाहबंधनात (फोटो- सोशल मिडिया)
उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनौमध्ये रिंकू सिंह आणि खासदार प्रिय सरोज हे विवाहबंधनात अडकणार आहेत. या सोहळ्यात क्रीडा, राजकारण आणि चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज आणि मोठ्या हजेरी लावली अशी शक्यता आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, अलीगड येथून रिंकू सिंह ची लग्नाची वरात लखनौला येणार असल्याचे म्हटले जात आहे. या विवाह सोहळ्यात केवळ अतिशय जवळच्या व्यक्तींनाच निमंत्रित करण्यात आले आहे. वरातीत सहभागी होण्यासाठी सुमारे ५० ते ६० खास पाहुण्यांची यादी तयार करण्यात आली आहे, ज्यामध्ये रिंकूचे कुटुंबिय, जवळचे नातेवाईक आणि त्याचे बालपणीचे काही मित्र यांचा प्रामुख्याने समावेश असण्याची शक्यता आहे.
Ans: रिंकू सिंहचे लग्न खासदार प्रिया सरोज यांच्याशी होणार आहे.
Ans: रिंकू सिंहचे लग्न 4 डिसेंबर 2026 रोजी होणार आहे.






