IND vs NZ: जस्सीचा जलवा! दोन विकेट घेताच श्रीनाथ यांचा विक्रम मोडला, Jasprit Bumrah ने परदेशात रचला इतिहास

Jasprit Bumrah 4th Wicket-Taker In Away Matches Surpasses Srinath: क्राइस्टचर्च येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीत जसप्रीत बुमराहने दुसऱ्या डावात दोन विकेट घेतले. यासह, त्याने जवागल श्रीनाथला मागे टाकत एका विशेष यादीत स्थान पटकावले आहे.
Jasprit Bumrah 4th Wicket-Taker In Away Matches
Jasprit Bumrah 4th Wicket-Taker In Away Matches
Published on: 
Updated on: 
  • जसप्रीत बुमराहची ऐतिहासिक झेप

  • जवागल श्रीनाथ यांना मागे टाकत रचला इतिहास

  • परदेशी मैदानावर केली ऐतिहासिक कामगिरी

Jasprit Bumrah: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना क्राइस्टचर्च येथे सुरू आहे. तिसऱ्या दिवशी किवी संघाने वर्चस्व गाजवले. न्यूझीलंडने गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही विभागात शानदार कामगिरी करत भारताला बॅकफूटवर ढकलले. भारतीय वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व करणाऱ्या जसप्रीत बुमराहने दुसऱ्या डावात दोन महत्वाचे विकेट्स घेतले.

यासह बुमराहने कारकिर्दित आणखी एक मोठा टप्पा गाठला आहे. या ३२ वर्षीय वेगवान गोलंदाजाने भारताचा माजी वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथला मागे टाकत परदेशात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विकेट्स घेण्याचा मान मिळवला आहे. यासह, बुमराह परदेशात भारताचा चौथा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे.

परदेशात जसप्रीत बुमराहची ऐतिहासिक कामगिरी

पहिल्या डावात एकही विकेट न मिळवलेल्या बुमराहने दुसऱ्या डावात शानदार पुनरागमन केले. त्याने अवघ्या आठ षटकांत न्यूझीलंडच्या दोन फलंदाजांना बाद केले. त्याने प्रथम टॉम लॅथमला बोल्ड केले आणि नंतर हेन्री निकोल्सला स्वतःच्याच गोलंदाजीवर झेलबाद करून भारताला दुसरे यश मिळवून दिले. निकोल्सच्या विकेटमुळे बुमराहने परदेशातील आपल्या आंतरराष्ट्रीय विकेट्सची संख्या ३४१ वर नेली.

बुमराहने २०१६ ते २०२६ दरम्यान परदेशात भारतासाठी आपला १४२ वा आंतरराष्ट्रीय सामना खेळून हा टप्पा गाठला. त्याने आतापर्यंत १७३ डावांमध्ये ३४१ विकेट्स घेतले आहेत. दरम्यान, जवागल श्रीनाथने १९९१ ते २००३ दरम्यान परदेशात १८४ सामन्यांच्या २११ डावांमध्ये ३४० विकेट्स घेतले होते.

Jasprit Bumrah 4th Wicket-Taker In Away Matches
IND vs NZ: हॅगली ओव्हलचा रेकॉर्ड टीम इंडियासाठी डोकेदुखी! किवींना रोखलं नाही तर भारत अडचणीत; चौथ्या डावात चमत्कार घडणार?

परदेशात भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज

परदेशात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विकेट्स घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत अनिल कुंबळे अव्वल स्थानी आहे. त्याने २४८ परदेशी सामन्यांच्या २९५ डावांमध्ये ४७७ विकेट्स घेतले आहेत. या यादीत ३९८ विकेट्ससह झहीर खान दुसऱ्या, तर ३६८ विकेट्ससह कपिल देव तिसऱ्या स्थानावर आहेत.

भारतीय संघ कमबॅक करणार ?

क्राइस्टचर्च कसोटी सामन्यात किवी संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे. न्यूझीलंडने पहिल्या डावात ३५६ धावा केल्या. तर, भारतीय संघ पहिल्या डावात २४३ धावांवर सर्वबाद झाला. भारतासाठी ध्रुव जुरेलने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ८८ धावांची शानदार खेळी करून टीम इंडियाला फॉलो-ऑनपासून वाचवले. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत किवी संघाने दुसऱ्या डावात, ३ विकेट्स गमावून १३३ धावा केल्या आहेत. न्यूझीलंडची आघाडी आता २४३ धावांवर पोहोचली आहे.

Jasprit Bumrah 4th Wicket-Taker In Away Matches
चक दे इंडिया! भारताच्या वाघिणींचा 'विजयी चौकार'; चीनला लोळवत चौथ्यांदा पटकावला Asian Champions Trophy चा किताब