कल्याण: कल्याण (Kalyan) तालुक्यातील ग्रामीम भागातील गोवेली येथील जीवनदीप कॉलेजच्या मुलींनी कॉमनवेल्थ स्पर्धेत यश संपादन केलं आहे. सुवर्णपदकावर (Gold Medal) आपलं नाव कोरलं आहे. कामिनी बोष्टे आणि काजल भाकरे या दोन्ही मुलींची कॉमनवेल्थ स्पर्धेसाठी (Commonwealth Games) निवड झाली. ही स्पर्धा न्यूझीलंड येथे २४ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत या दोन्ही मुलींनी पॉवर लिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे आध्यक्ष रवींद्र घोडविंदे यांनी अभिनंदन केले आहे. तर कल्याण ग्रामीण भागातील मुलींनी परदेशात आपल्या कामगिरीचा ठसा उमटवित कॉमनवेल्थ स्पर्धेत पॉवरलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदकाचा मान प्राप्त केल्याने समाजातील सर्वच स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.