Kavya Maran To Marry Anirudh ravichander
एसआरएचची मालकीण काव्या मारन आणि ‘जेलर २’ चे संगीतकार अनिरुद्ध रविचंद्रन ११ नोव्हेंबर रोजी विवाहबंधनात अडकणार आहेत. हे जोडपे ग्रीसमध्ये कुटुंब आणि मित्रांच्या उपस्थितीत विवाहबंधनात अडकणार आहे. त्यानंतर २१ नोव्हेंबर रोजी चेन्नईतील एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये भव्य रिसेप्शन आयोजित केले जाण्याची शक्यता आहे. या रिसेप्शनला अनेक प्रमुख चित्रपट कलाकार, क्रिकेटपटू आणि राजकीय व्यक्ती उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. परंतु, काव्या मारन किंवा अनिरुद्ध रविचंद्रर या दोघांनीही याची अधिकृत घोषणा केलेली नाही.
तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी काव्या मारनचे वडील आणि सन ग्रुपचे चेअरमन कलानिधी मारन व त्यांच्या पत्नी कावेरी मारन यांच्यासोबतचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. तेलंगणा सीएमओच्या ‘एक्स’ अकाऊंटवर शेअर केलेल्या या फोटोंसोबतच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘सन ग्रुपचे चेअरमन कलानिधी मारन आणि श्रीमती कावेरी मारन यांनी माननीय मुख्यमंत्री श्री. रेवंत रेड्डी यांच्या ज्युबिली हिल्स येथील निवासस्थानी भेट घेतली. त्यांनीआपली मुलगी काव्या मारनच्या विवाह सोहळ्यासाठी आमंत्रित केले. काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांचा विवाह सोहळा २१ नोव्हेंबर रोजी चेन्नई येथे पार पडेल.’
Sun Group Chairman Shri Kalanithi Maran and his wife, Smt. Kavery Maran, met Hon’ble Chief Minister Shri A. Revanth Reddy at his residence in Jubilee Hills and invited him to the wedding reception of their daughter, Kavya Maran. The wedding reception of Kavya Maran and Anirudh… pic.twitter.com/eMnnHSmAkb — Telangana CMO (@TelanganaCMO) October 16, 2026
काव्या मारन (Kavya Maran) ही सन ग्रुपचे (SUN Group) चेअरमन कलानिधी मारन आणि कावेरी मारन यांची मुलगी आहे. काव्या ही सन ग्रुपच्या मालकीच्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) फ्रँचायझी सनरायझर्स हैदराबादची मालक देखील आहे. ती अनेकदा आयपीएल सामन्यांना उपस्थित राहून आपल्या संघाला सपोर्ट करताना दिसते.
अनिरुद्ध रविचंद्रर हा एक प्रसिद्ध संगीतकार आहे. तो २०१२ मध्ये तमिळ चित्रपट ‘3’ मधील ‘व्हाय धिस कोलावेरी डी’ या गाण्यामुळे जागतिक स्तरावर प्रसिद्ध झाला. त्यानंतर त्याने २०१४ मध्ये ‘कथी’ आणि ‘वेलाईइल्ला पट्टाधारी’ यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांसाठी संगीत दिले. पुढे त्याने २०२१ मध्ये ‘मास्टर’, २०२३ मध्ये शाहरुख खानच्या ‘जवान’, २०२५ मध्ये अजित कुमारच्या ‘विदामुयार्ची’ या सर्व्हायव्हल ॲक्शन थ्रिलर आणि २०२५ मध्ये रजनीकांतच्या ‘कुली’ या ब्लॉकबस्टर चित्रपटांसाठी संगीत दिले.
IND vs WI: पाचव्या टी-२० मध्ये पावसाचा खेळखंडोबा? विजयाचं स्वप्न भंगणार? बंगळुरूमध्ये वादळाचा अलर्ट






