ऑरेंज कॅप न जिंकणारे खेळाडू (फोटो- ai gemini)
28 मार्चपासून सुरू होणार आयपीएल 2026
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध हैदराबाद यांच्यात सामना
अनेक दिग्गज खेळाडूंचे ऑरेंज कॅपचे स्वप्न भंगले
IPL News: यंदाचा आयपीएलचा सीझन हा 28 मार्चपासून सुरू होणार आहे. खरेतर 2008 मध्ये आयपीएल सुरू झाल्यापासून आतापर्यंत अनेक खेळाडूंनी रेकॉर्ड केले आहेत. आयपीएल स्पर्धेत यंदा पहिला सामना हा सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात होणार आहे. दरम्यान आज आपण असे 5 खेळाडू पाहणार आहोत, ज्यांना एकदाही ऑरेंज कॅप जिंकता आलेली नाही.
आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूला ऑरेंज कॅप दिली जाते. तर सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या खेळाडूला पर्पल कॅप दिली जाते. आज आपण असे 5 दिग्गज खेळाडू जाणून घेणार आहोत ज्यांना आजपर्यंत कधीच ऑरेंज कॅप मिळालेली नाही.
एबी डी व्हिलियर्स
एबी डी व्हिलियर्स हा दक्षिण आफ्रिकेचा प्रसिद्ध खेळाडू आहे. त्याने आयपीएलमधून आपल्या करियरची सुरुवात दिल्ली डेअरव्हील्सकडून केली. ऑरेंज कप न मिळालेल्या 5 दिग्गज खेळाडूंच्या यादीत एबी डी व्हिलियर्सचे नाव 5 व्या स्थानावर आहे. 2011 पासून तो बंगलोर संघासाठी खेळत आहे. त्याने आतापर्यंत 5 हजार पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. मात्र त्याला एकाही सीझनमध्ये ऑरेंज कॅप जिंकता आलेली नाही.
काय सांगता! Dhoni-Raina ‘आयपीएल’मध्ये खेळताना दिसणार? 22 तारखेला काय होणार? CSK थेट…
एमएस धोनी
चेन्नई सुपर किंग्सचा माजी कर्णधार आणि बेस्ट फिनिशर म्हणून ओळख असलेला खेळाडू म्हणजे महेंद्रसिंह धोनी. एमएस धोनीला देखील आतापर्यंत आयपीएलमध्ये ऑरेंज कॅप जिंकता आलेली नाही. धोनीचे या यादीत नाव चौथ्या स्थानावर आहे. त्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत 5349 धावा केल्या आहेत.
रोहित शर्मा
रोहित शर्माचे नाव देखील ऑरेंज कॅप न जिंकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत समावेश आहे. त्याने आतापर्यंत 7000 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने 5 वेळेस आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. मात्र आतापर्यंत त्याला ऑरेंज कॅप जिंकता आलेली नाही.
शिखर धवन
शिखर धवन आतापर्यंत दिल्ली, मुंबई आणि पंजाब संघाकडून खेळला आहे. त्याच्या नेतृत्वात सनरायजर्स हैदराबाद संघाने विजेतेपद पटकावले आहे. मात्र शिखर धवनला ऑरेंज कॅप जिंकता आलेली नाही.
Dhoni-Raina ‘आयपीएल’मध्ये खेळताना दिसणार?
लवकरच आयपीएलचा हंगाम सुरू होणार आहे. येत्या 28 मार्चपासून आयपीएलचा हंगाम सुरू होणार आहे. मात्र त्याआधी चेन्नईच्या चेपॉकमध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाबबत एक मोठी बातमी समोर येत आहे. चेन्नई सुपर किंग्स संघाने आयपीएलमध्ये 5 वेळा विजेतेपद पटकावले आहे. आयपीएल सुरू होण्याआधी चेन्नईच्या संघाने मेगा रियुनियन आयोजित केले आहे.






