(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
संघाची कमान भारतीय विकेटकीपर-फलंदाज इशान किशनकडे सोपवली आहे. नियमित कर्णधार पॅट कमिन्स दुखापतीतून सावरत असून मोसमातील पहिल्या काही सामन्यांसाठी तो उपलब्ध होणार नाही. ईशान किशनसाठी ही एक मोठी जबाबदारी आहे कारण तो गेल्या हंगामातच ११.२५ कोटी रुपयांच्या मोठ्या रकमेसह या संघाचा भाग बनला होता. अलीकडेच भारताच्या T20 विश्वचषक विजयात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आता किशनकडे आयपीएलमध्ये कर्णधारपद सिद्ध करण्याची उत्तम संधी आहे. त्यामुळे इशान किसन आयपीएल हंगामात काय कमाल दाखवतोय, आणि फ्रँचायझीने दाखवलेला विश्वास सिद्ध करतोय की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
𝐀𝐍𝐍𝐎𝐔𝐍𝐂𝐄𝐌𝐄𝐍𝐓 🚨 Pat Cummins will miss a few games while recovering from injury. Until he recovers, Ishan Kishan will be the Captain and Abhishek Sharma will be the Vice-Captain. pic.twitter.com/etXJUkQJeG — SunRisers Hyderabad (@SunRisers) March 18, 2026
या नव्या नेतृत्वाच्या संघात युवा सलामीवीर अभिषेक शर्माला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. सनरायझर्स हैदराबादने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर या निर्णयाची माहिती देताना लिहिले की, ‘पॅट कमिन्स दुखापतीतून सावरताना काही सामने खेळू शकणार नाही. तो पूर्णपणे तंदुरुस्त होईपर्यंत इशान किशन संघाचा कर्णधार असेल आणि अभिषेक शर्मा उपकर्णधाराची भूमिका बजावेल.
गेल्या सीझनबद्दल बोलायचे झाले तर इशानची कामगिरी संमिश्र होती. त्याने 14 सामन्यात 152.58 च्या स्ट्राईक रेटने 354 धावा केल्या, ज्यात एक शानदार शतक आणि अर्धशतकांचा समावेश आहे. पण आताचा फॉर्म बघत इशानची कामगिरी कौतुकास्पद असेल हे मात्र खरं. पण त्यात कर्णधारपदाच्या अतिरिक्त जबाबदारीमुळे त्याच्या खेळात आणखी सुधारणा होईल, अशी आशा संघाला आहे.






