जसप्रीत बुमराहला मोठा धक्का (फोटो -ians)
ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने आपल्या कारकिर्दीत पहिल्यांदाच आयसीसी कसोटी क्रमवारीत प्रथम क्रमांकावर कब्जा केला आहे. स्टार्कने त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याने बुमराहला मागे टाकून ही कामगिरी केली आहे. दीर्घ काळापासून पहिल्या क्रमांकावर वर्चस्व गाजवणारा बुमराह आता दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने आपल्या कारकिर्दीत पहिल्यांदाच आयसीसी कसोटी क्रमवारीत प्रथम क्रमांकावर कब्जा केला आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत न खेळल्यामुळे बुमराहच्या आयसीसी पॉईंट्समध्ये घट झाली आहे. सिरिजमध्ये दोन्ही सामने बुमराह खेळू शकला नव्हता. त्यामुळे त्याला आयसीसी क्रमवारीत मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. आता पुन्हा एकदा अव्वल स्थानी पोहोचण्यासाठी बुमराहला आगामी कसोटी मालिकांमध्ये दमदार पुनरागमन करून अप्रतिम कामगिरी करावी लागणार आहे.
२०२७ च्या वर्ल्ड कपनंतर Jasprit Bumrah फक्त टी-२० खेळणार? काय आहे BCCIचा ‘मास्टर प्लॅन’
इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 36 वर्षीय मिशेल स्टार्कने नवा इतिहास रचला आहे. 15 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत त्याने प्रथमच आयसीसी क्रमवारीत पहिले स्थान पटकावले आहे. त्याने भारताचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहला मागे टाकले आहे.बांगलादेशविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला होता. त्या सामन्यात स्टार्कने 2 विकेट्स घेतल्या होत्या. मात्र दुसऱ्या सामन्यात स्टार्कने जोरदार पुनरागमन केले आहे.
IND Vs SL: श्रीलंकेत हिंमतच नाही! फॉलोऑननंतर दुसऱ्या डावात स्थिती बिकट; भारताचा विजय उद्यावर
स्टार्कच्या या १० विकेट्सच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने हा सामना एक डाव आणि ५१ धावांनी जिंकत सिरिज १-१ अशी बरोबरीत सोडवली. उत्कृष्ट कामगिरीसाठी स्टार्कला ‘प्लेअर ऑफ द सिरीज’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या ऐतिहासिक कामगिरीमुळे त्याने भारताच्या जसप्रीत बुमराहला अव्वल स्थानावरून हटवून कसोटीतील ‘नंबर १’ गोलंदाज होण्याचा बहुमान मिळवला.






