भारताने जिंकले गोल्ड आणि सिल्व्हर मेडल (फोटो- ट्विटर)
महिलांच्या १० मीटर एअर रायफल एसएच-१ या स्पर्धेत भारताच्या मोना अग्रवालने सुंदर खेळ करत सुवर्णपदक जिंकले आहे. तर दुसरीकडे देशाची स्टार पॅराॲथलीट आणि दोन वेळा पॅरालिम्पिक चॅम्पियन राहिलेली अवनि लेखरा हिने देखील चमकदार खेळ करत सिल्व्हर मेडल जिंकले आहे. या रोमांचक आणि शानदार खेळात पदके जिंकून भारताची मान अभिमानाने उंचावली आहे.
Asian Para Games 2026: पॅरा आर्चर शीतल देवीने केली जागतिक विक्रमाशी बरोबरी, नवा रेकॉर्ड केला स्थापित
स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी एकाच प्रकारात सुवर्ण आणि रजत पदक जिंकून भारताने आपल्या विजयी मोहिमेची जोरदार सुरुवात केली आहे. या दोघींच्या या ऐतिहासिक यशाबद्दल संपूर्ण देशभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंकडून अशाच सुवर्ण कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ ची कांस्य पदक विजेता मोना अग्रवाल हिने सोमवारी अत्यंत आक्रमक आणि अचूक लय दाखवत महिलांच्या १० मीटर एअर रायफल एसएच-१ (SH1) स्पर्धेत सुवर्णपदक आपल्या नावावर केले. मोना अग्रवाल हिने फायनलमध्ये शानदार फॉर्म दाखवत २५०.० पॉईंट्सची कामगिरी केली. याच स्पर्धेत भारताच्या दोन वेळा पॅरालिम्पिक चॅम्पियन अवनि लेखरा हिने रजत पदक पटकावले होते.
THE GOLDEN GIRLS ARE HERE 🔥🔥🔥 Mona Agarwal🥇
Avani Lekhara🥈 Avani has also secured the Quota for the 2028 Paralympics 🔥🔥 Mona on the other hand have secured the Quota already at the World Championships 🔥 ❤️💙 2 quota for India at the 10m Air Rifle Shooting SH1 https://t.co/QWPdyL97iJ — SPORTS ARENA🇮🇳 (@SportsArena1234) October 19, 2026
पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ ची कांस्य पदक विजेता मोना अग्रवाल सोमवारी अत्यंत आक्रमक खेळ करताना दिसून आली. अतिशय रोमांचक ठरलेल्या या अंतिम फेरीत मोना अग्रवालने शेवटच्या शॉटवर बाजी मारली. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेतील कांस्य पदक दक्षिण कोरियाच्या युनरी ली ने जिंकले. आशियाई पॅरा खेळांच्या पदक तालिकेत भारताने अतिशय दणदणीत एन्ट्री केली आहे.






