IPL 2025: Pakistan bans Mumbai Indians player, 'that' agreement ignored...
IPL 2025 : आयपीएल २०२५ चा १८ वा हंगाम चांगलाच रंगात आला आहे. आतापर्यंत २४ सामने खेळवण्यात आले आहेत. याबरोबर आता गुणतालिकेत देखील संघा-संघामध्ये स्पर्धा बघायला मिळत आहे. अशातच आता क्रीडा विषवातून एक बातमी समोर आली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू कॉर्बिन बॉशला पाकिस्तान सुपर लीग २०२५ मधून एका वर्षासाठी बंदी घालण्यात आली आहे. कॉर्बिनने पीएसएल २०२५ कराराकडे कानाडोळा करत आयपीएल २०२५ मध्ये खेळण्यास प्राधान्य दिले होते. यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. पाकिस्तान सुपर लीग २०२५ ची आजपासून (११ एप्रिल) सुरवात होत आहे. ज्याचा पहिला सामना इस्लामाबाद युनायटेड आणि लाहोर कलंदर्स या दोन संघामध्ये खेळवला जाणार आहे.
हेही वाचा : IPL 2025 : ऋतुराज गायकवाडच्या जागी Prithvi Shaw ची एंट्री? बदली खेळाडू म्हणून आजमवणार नशीब..
आजपासून पीएसएल २०२५ ची सुरवात होत आहे. पीएसएल २०२५ च्या ड्राफ्टमध्ये पेशावर झल्मी संघाकडून दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कॉर्बिन बॉस्कना सामील करून घेण्यात आले होते. मात्र, आयपीएल २०२५ सुरू होण्याची वेळ आली तेव्हा मुंबई इंडियन्सचा गोलंदाज लिझार्ड विल्यम्स दुखापत होऊन स्पर्धेतून बाहेर पडला आहे. तेव्हा त्याच्या जागी मुंबई इंडियन्स फ्रँचायझीने कॉर्बिन बॉस्कला बदली खेळाडूची ऑफर दिली. ती त्याने स्वीकारली आणि मुंबई इंडियन्सच्या संघात सामील झाला. पीएसएलचा करार हातात असून देखील कॉर्बिन एमआय संघात सहभागी झाला. यामुळे आता वाद निर्माण झाला आहे.
पीसीबीकडून जाही करण्यात आलेल्या निवेदनानुसार, कॉर्बिन बॉस्क म्हणाला, ‘मी पेशावर झल्मीच्या निष्ठावंत चाहत्यांची माफी मागतो. मी जे काही केले आहे, त्याची मी पूर्ण जबाबदारी घेतो आणि मी शिक्षा देखील स्वीकारतो. ज्यामध्ये दंड आणि पीएसएलमधून एक वर्षाची बंदी सामील आहे.’
कॉर्बिन बॉस्क याने पीएसएल लीग सोडून आयपीएलमध्ये एमआयच्या संघात जाण्याचा निर्णय घेतला. त्याला दोन्ही लीगमधून जवळजवळ समान पगार देऊ केला होता. आयपीएल २०२५ मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्यासाठी त्याला ७५ लाख रुपये मानधन देण्यात आले. तर दुसरीकडे पीएसएलमध्ये खेळण्यासाठी त्याला ५०-७५ लाख रुपये देण्यात येणार होते. कॉर्बिन बॉस्कला आतापर्यंत आयपीएल २०२५ मध्ये मुंबई इंडियन्सकडून त्याला अद्याप एकही सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही.