Neeraj Chopra out of Asian Games
Auqib Nabi साठी BCCI चा ‘स्पेशल प्लॅन’! न्यूझीलंड दौऱ्याआधी इंग्लंडला पाठवणार; काय आहे खास कारण?
नीरज चोप्राने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर त्याच्या दुखापतीबद्दल आणि हा सीझन न खेळण्याच्या निर्णयाबद्दल पोस्ट केली. नीरजने लिहिले की, ‘खूप मेहनतीनंतर,लुसानेमध्ये माझ्या ‘सीझनमधील सर्वोत्तम थ्रो’मुळे मला अखेर मोमेंटम मिळाला आहे. दुर्दैवाने, त्यानंतर लगेचच, सरावादरम्यान माझ्या घोट्यातील लिगामेंट फाटली. माझे डॉक्टर आणि टीमशी चर्चा केल्यानंतर, आम्ही ठरवले आहे की मी या सीझनच्या उर्वरित सामन्यांमध्ये सहभागी होणार नाही.’
त्याने पुढे लिहिले की, ‘हे निराशाजनक आहे, कारण मला वाटत होते की मी माझी लय शोधली आहे, पण ते म्हणतात ना, अडथळा हे प्रवासाचाच एक भाग असतात. आता माझे लक्ष फक्त व्यवस्थित बरे होण्यावर आणि पूर्वीपेक्षा अधिक ताकदीने कमबॅक करण्यावर आहे. तुमच्या सर्वांच्या प्रेमाबद्दल आणि पाठिंब्याबद्दल धन्यवाद.’
pic.twitter.com/LwounijYk7 — Neeraj Chopra (@Neeraj_chopra1) August 29, 2026
या दुखापतीमुळे नीरज चोप्रा जपानमधील आयची-नागोया येथे होणाऱ्या २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भाग घेऊ शकणार नाही, हा भारतासाठी एक मोठा धक्का आहे. नीरजच्या अनुपस्थितीमुळे भारताला ॲथलेटिक्समधील एक संभाव्य पदक गमवावे लागेल. आशियाई क्रीडा स्पर्धा १९ सप्टेंबरपासून सुरू होऊन ४ ऑक्टोबरपर्यंत चालतील. परंतु,, भारताचा ‘गोल्डन बॉय’ नीरजने पुरुषांच्या भालाफेकीतील आपले विजेतेपद राखण्याची संधी गमावली आहे.
२८ वर्षीय नीरज चोप्रासाठी २०२६ चा हंगाम संमिश्र स्वरूपाचा होता. दुखापतीमुळे दीर्घकाळ खेळापासून दूर राहिल्यानंतर, नीरजने जूनमध्ये दोहा डायमंड लीगमध्ये पुनरागमन केले आणि ८५.६९ मीटर थ्रो करून चौथे स्थान पटकावले. त्यानंतर त्याने ग्लासगो येथे झालेल्या २०२६ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ८५.८३ मीटरच्या कामगिरीसह रौप्य पदक जिंकले आणि मग लुसाने डायमंड लीगमध्ये आपल्या हंगामातील सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. नीरजने लुसाने डायमंड लीगमध्ये ८८.०५ मीटरची सर्वोत्तम कामगिरी करत दुसरे स्थान पटकावले.






