Tata IPL KKR vs CSK Playing 11 (फोटो- सोशल मिडिया)
ऋतुराज गायकवाड अन् अजिंक्य रहाणे येणार आमनेसामने
हेड टू हेड रेकॉर्ड्समध्ये सीएकेचे पारडे जड
केकेआर संघ आणि चाहते विजयाच्या प्रतीक्षेत
Tata IPL 2026 CSK vs KKR: आज केकेआर आणि सीएकके आमनेसामने येणार आहेत. दोन्ही संघासाठी आयपीएलचा मधला आजचा सामना अत्यंत महत्वाचा असणार आहे. केकेआर आज आपला पहिला विजय (IPL 2026) मिळावा आणि गुणतालिकेत दोन अंक प्राप्त व्हावेत यासाठी खेळणार आहे. तर सीएकके सापडलेली विजयाची लय कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल.
आज संध्याकाळी 7.30 वाजता चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात सामना होणार आहे. कर्णधार ऋतुराज गायकवाड चेन्नई सुपर किंग्जचे तर कर्णधार अजिंक्य रहाणे केकेआरचे नेतृत्व करत आहे. केकेआरचा संघ आणि चाहते पहिला विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी उत्सुक झाले आहेत.
आज आपण चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स संघाचे प्लेइंग 11 आणि हेड टू हेड रेकॉर्ड बाबत जाणून घेऊयात आजचा सामना दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्वाचा समजला जात आहे. आजचे पीच हे स्पिनर्ससाठी देखील फायदेशीर समजले जात असल्याने सुनील नरेन आणि वरून चक्रवर्ती, नूर अहमद चांगली कामगिरी करू शकतात.
CSK Vs KKR Pitch Report: ‘केकेआर’ पराभवाचा चौकार लगावणार की…; कसे असणार आजचे पीच?
हेड टू हेड रेकॉर्डस
आयपीएलच्या इतिहासात सीएकके अन् केकेआर 32 वेळा आमनेसामने आले आहेत. त्यामध्ये 20 सामने सीएसकेने जिंकले आहेत. तर 12 सामने केकेआरने जिंकले आहेत. त्यामुळे आजचा सामना सुरू होण्याआधी सीएसकेचे पारडे जड आहे. संजू सॅमसनला सूर गवसला आहे. मागील सामन्यात त्याने शतकी खेळी केली आहे.
काय आहे आजचा पीच रिपोर्ट?
एम.ए. चिदंबरम स्टेडियमची आजची खेळपट्टी थोडीशी वेगळी असल्याचे म्हंटले जात आहे. पहिल्यांदा हे पीच स्लो होते. मात्र आता लाल मातीमुळे येथे पीच थोडे फास्ट असे झाले आहे. सुरुवातीला फलंदाजांना मदत मिळू शकते. मात्र मधले काही ओव्हर्स स्पिनर्सला फायदा होताना दिसेल. दुसऱ्या डावात गोलंदाजी करणे थोडे अवघड जाऊ शकते. त्यामुळे टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय योग्य ठरू शकतो.
IPL दरम्यान गर्लफ्रेंडसह गुरुद्वारा पोहचला Arshdeep Singh, व्हिडिओ Viral; नात्यावर शिक्कामोर्तब?
सीएसकेची संभाव्य टीम: ऋतुराज गायकवाड (कर्णधार), संजू सॅमसन , आयुष म्हात्रे, डेवाल्ड ब्रेविस, सरफराज खान, शिवम दुबे, जेमी ओव्हरटन, अकिल हुसेन , नूर अहमद, खलील अहमद, अंशुल कंबोज, गुर्जनप्रीत सिंग, कार्तिक शर्मा.
केकेआरची संभाव्य टीम: अजिंक्य रहाणे (कर्णधार), फिन ॲलन, कॅमेरून ग्रीन, अँगक्रिश रघुवंशी (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, रोवमन पॉवेल, रमणदीप सिंग, सुनील नरीन, नदीप सैनी, वैभव अरोरा, कार्तिक त्यागी, वरुण चक्रवर्ती






