Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

NZ vs PAK T20 : 6,6,6 आणि पुन्हा 6…! न्यूझीलंडच्या ‘या’ वादळात पाकिस्तानी गोलंदाज शाहीन आफ्रिदी नेस्तनाबूत..; पहा Video

न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात 5 सामन्यांची T20 मालिका खेळवली जात आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत मालिकेतील 2 सामने खेळले गेले असून दोन्ही सामन्यात न्यूझीलंड संघाने  पाकिस्तान संघाचा पराभव केला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Mar 18, 2025 | 05:52 PM
NZ vs PAK T20: 6,6,6 and again 6…! New Zealand's 'Ya' storms Pakistani bowler Shaheen Afridi's destruction..

NZ vs PAK T20: 6,6,6 and again 6…! New Zealand's 'Ya' storms Pakistani bowler Shaheen Afridi's destruction..

Follow Us
Close
Follow Us:

NZ vs PAK T20 : न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात 5 सामन्यांची T20 मालिका खेळवली जात आहे. या मालिकेचे यजमानपद न्यूझीलंडकडे आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत मालिकेतील 2 सामने खेळले गेले असून दोन्ही सामन्यात न्यूझीलंड संघाने  पाकिस्तान संघाचा पराभव केला आहे. पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानचा 9 गडी राखून मोठ्या फरकाने पराभव केला, तर दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने 11 चेंडू शिल्लक असताना सामना आपल्या नावे केला. न्यूझीलंडने या मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली आहे.

पाकिस्तान क्रिकेट संघाची अवस्था दिवसेंदिवस अतिशय खालावत चालली आहे. पाकिस्तानकडे यजमानपद असलेल्या चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेत पाकिस्तान संघाला साखळी सामन्यात आपल्या गाशा गुंडाळाव्या लागलया होत्या. त्यामुळे पाकिस्तानी खेळाडूंना चाहत्यांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे.  अशातच आता न्यूझीलंडने दुसऱ्या टी-२० सामन्यात पाकिस्तानी गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत शानदार विजय मिळवला आहे. त्यामुळे आता पाकिस्तान संघावर जोरदार टीका होत आहे.

आता दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर पाकिस्तानी संघ सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल होत आहे. दुसऱ्या टी-20 सामन्यात पाकिस्तान संघाने न्यूझीलंडला 136 धावांचे आव्हान दिले होते. न्यूझीलंड संघाने हे लक्ष 11 चेंडू शिल्लक असतानाच पूर्ण केले. पावसामुळे हा सामना १५ षटकांचा ठेवण्यात आला होता.

हेही वाचा : NZ vs PAK 2nd T20: न्यूझीलंडकडून पाकिस्तानला पुन्हा धोबीपछाड; दुसरा T20 सामनाही टाकला खिशात..

शाहीनच्या एका षटकात ठोकले 4 षटकार..

न्यूझीलंडच्या विजयात ओपनर बॅट्समन टीम सेफर्टने महत्त्वाची भूमिका वठवली आहे.  त्याने केवळ  22 चेंडूत तीन चौकार आणि पाच षटकारांची आतिषबाजी करत 45 धावा केल्या. याशिवाय सेफर्टने पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीच्या एकाच षटकात 4 षटकार मारून त्याची हवाच काढून टाकली. यानंतर न्यूझीलंडच्या टीम सेफर्टचे सर्वत्र कौतुक होत आहे. तर दुसरीकडे, सर्वजण पाकिस्तानच्या गोलंदाजांना ट्रोल करताना दिसून येत आहेत.

शाहीनच्या तिसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर टीम सेफर्टने लांब षटकार लगावला. यानंतर टीमने दुसऱ्या चेंडूवर एक्स्ट्रा कव्हर्सच्या दिशेने षटकार मारला. पण, तिसरा चेंडू डॉट गेला. त्यानंतर चौथ्या चेंडूवर टिमने बॅकवर्ड पॉइंटकडे दोन धावा काढल्या. त्यानंतर टीमने ओव्हरच्या पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर षटकार ठोकून आफ्रिदीची हवा टाय टाय फिस्स करून टाकली.  यानंतर सोशल मीडियावर लोकांनी शाहीनची खूपच टर उडवली.  केवळ भारतातच नाही तर पाकिस्तानी क्रिकेट चाहते देखील शाहीन शाह आफ्रिदीची खिल्ली उडवताना दिसत आहेत.

हेही वाचा : Hardik Pandya : काळाचे चक्र माझ्यासाठी ३६० अंशांनी फिरले, आता तरी चाहत्यांकडून प्रेम मिळेल; हार्दिक पंड्याला आशा…

Seifert has 7 letters, so does Maximum 🤌 Tim Seifert took Shaheen Afridi to the cleaners in his second over, smashing four sixes in it 🤯#NZvPAK pic.twitter.com/F5nFqmo7G6 — FanCode (@FanCode) March 18, 2025

पाकिस्तानचे 135 धावांचे आव्हान..

दुसरा टी-२० सामना पावसामुळे उशिरा सुरू करण्यात आला. सामन्यातील षटके कमी केल्यानंतर हा सामना १५ षटकांचा करण्यात आला होता. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 15 षटकांत 9 गडी गमावून 135 धावांपर्यंत मजल मारली. पाकिस्तानकडून कर्णधार सलमान आगाने  28 चेंडूत ४६ धावा केल्या. इतर फलंदाजांना मात्र आपली छाप पाडता आली नाही.

1st over 2nd over pic.twitter.com/rVBMiE6yWm — Out Of Context Cricket (@GemsOfCricket) March 18, 2025

न्यूझीलंडने 13 षटकांत नोंदवाला विजय..

पाकिस्तानने दिलेल्या 136 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाने चांगली कामगिरी केली. न्यूझीलंडने केवळ 13 षटकांमध्ये 137 धावा करत 5 विकेट राखून विजय मिळवला. पाच सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडने 2-0 अशी आघाडी घेतली आहे. उल्लेखनीय बाब  म्हणजे न्यूझीलंड संघाने पहिल्या T20 सामन्यात पाकिस्तानचा 61 चेंडूत आणि दुसऱ्या सामन्यात 79 चेंडूत पराभव केला होता.

 

Web Title: Nz vs pak t20 tim seifert hits 4 sixes in a single over off shaheen afridi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2025 | 05:52 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.