फोटो सौजन्य - Bangladesh Cricket सोशल मिडिया
ODI World Cup 2027 : २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या तयारीला सर्व संघ लागले आहेत. टी20 विश्वचषक झाल्यानंतर आता एकदिवसीय विश्वचषकाकडे सर्वाचे लक्ष असणार आहे. आयसीसीने देखील टी20 विश्वचषक झाल्यानंतर आता एकदिवसीय मालिका संघ खेळत आहे. पाकिस्तान विरूद्ध बांग्लादेश यांच्यामध्ये नुकतीच तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका पार पडली. २०२६ च्या टी२० विश्वचषकानंतर, पाकिस्तान तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी बांगलादेशचा दौरा करत आहे.
बांगलादेशने पाकिस्तानला २-१ ने हरवून एकदिवसीय मालिका जिंकली. बांगलादेशच्या या विजयामुळे २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या पात्रता प्रक्रियेत थोडा बदल झाला आहे. बांगलादेशचा मार्ग सोपा झाला आहे, तर वेस्ट इंडिजला आव्हानांना सामोरे जावे लागू शकते.
पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना बांगलादेशने जिंकला, तर दुसरा सामना जिंकून पाकिस्तानने मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. त्यानंतर बांगलादेशने अंतिम सामन्यात पुनरागमन करत पाकिस्तानला ११ धावांनी पराभूत करून मालिका २-१ ने जिंकली. आता, २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या पात्रता फेरीत पाकिस्तानकडून पराभव झाल्यामुळे वेस्ट इंडिजला मोठा धक्का बसला आहे.
मालिका विजयानंतर, बांगलादेश आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत १० व्या स्थानावरून ९ व्या स्थानावर पोहोचला, तर वेस्ट इंडिज ९ व्या स्थानावरून १० व्या स्थानावर घसरला. २०२७ चा एकदिवसीय विश्वचषक दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे येथे आयोजित होणार आहे. याचा अर्थ असा की, दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे २०२७ च्या विश्वचषकात यजमान म्हणून खेळतील, परंतु उर्वरित आठ संघांना त्यांच्या आयसीसी एकदिवसीय क्रमवारीनुसार जागा दिल्या जातील. त्यामुळे, जर वेस्ट इंडिज आपले आगामी एकदिवसीय सामने हरले, तर ते २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या पात्रता फेरीतून बाहेर पडू शकतात.
Victory for the Tigers! 🏏🐯A thrilling contest ends with Bangladesh lifting the series against Pakistan 2-1! Every run, wicket, and catch brought the fans to their feet
#BCB #Cricket #Bangladesh #Pakistan #ODI pic.twitter.com/TT9J3fEb14 — Bangladesh Cricket (@BCBtigers) March 15, 2026
आगामी वेळापत्रकाबाबत बोलायचे झाल्यास, बांगलादेश डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळेल, तर वेस्ट इंडिज ऑक्टोबरमध्ये भारताविरुद्ध खेळेल. सर्व १० संघ आता आगामी एकदिवसीय विश्वचषकावर लक्ष केंद्रित करत आहेत. मागचा एकदिवसीय विश्वचषक भारतात खेळला गेला होता आणि तो ऑस्ट्रेलियाने जिंकला होता. अंतिम सामन्यात भारताचा पराभव झाला होता.






