इमाम उल हक वर कारवाई होणार? (फोटो- सोशल मिडिया)
इंग्लंड दौऱ्यात पाकिस्तानने दोन कसोटी सामने पराभवाचा सामना केला आहे. त्यानंतर पाकिस्तान क्रिकेट संघात आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. दारुण पराभवानंतर पीसीबीने तडकाफडकी निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. संघातील सात महत्त्वाच्या खेळाडूंना मायदेशी परतण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मायदेशी परत पाठवण्यात आलेल्या खेळाडूंमध्ये दुखापतग्रस्त झालेला सलामीवीर फलंदाज इमाम-उल-हक आणि अनुभवी यष्टीरक्षक-फलंदाज मोहम्मद रिझवान यांच्या नावांचा समावेश असल्याने क्रिकेट जगतात खळबळ उडाली आहे.
ENG Vs PAK: आधीच सपशेल फ्लॉप अन् त्यात आला ताप! पाकड्यांना लागली नजर, ‘हा’ खेळाडू आजारी
लॉर्ड्स कसोटीदरम्यान इमाम-उल-हक दुखापतग्रस्त झाल्यामुळे मैदानातून बाहेर पडला होता. मात्र, तो खरोखरच दुखापतग्रस्त आहे की संघातून काढता पाय घेण्यासाठी त्याने दुखापतीचे बनावट नाटक रचले, असा गंभीर आरोप आता त्याच्यावर होत आहे. क्रीडा वर्तुळात आणि पाकिस्तानच्या माजी खेळाडूंकडून इमामच्या या वर्तनावर प्रचंड टीका होत आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, पीसीबी या प्रकरणाची अत्यंत गांभीर्याने चौकशी करत आहे. आरोप सिद्ध झाल्यास इमाम-उल-हकवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यास बंदी घातली जाण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे विकेटकिपर अन् फलंदाज मोहम्मद रिझवान याला अचानक मायदेशी बोलावल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. या अचानक झालेल्या हकालपट्टीमुळे रिझवानची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द आता जवळपास संपुष्टात आल्यात जमा आहे.
एकाच वेळी सात खेळाडूंना दौऱ्यावरून थेट मायदेशी परत पाठवण्याच्या पीसीबीच्या या अनपेक्षित आणि कठोर निर्णयामुळे संपूर्ण संघात भीतीचे वातावरण पसरले आहे. लॉर्ड्समधील पराभवानंतर बोर्ड आता संघात अमूलाग्र बदल करण्याच्या तयारीत असून येत्या काही दिवसांत आणखी काही मोठ्या खेळाडूंवर कारवाईची कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.






