बाबर आझम आजारी
पहिल्या दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये झालेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर संपूर्ण क्रिकेट विश्वातून पाकिस्तान संघावर चहुबाजूंनी टीका होत आहे. या अत्यंत खालच्या दर्जाच्या कामगिरीची गंभीर दखल घेत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मालिकेच्या मध्य्यातच अत्यंत कठोर पावले उचलत तब्बल ७ खेळाडूंना तात्काळ मायदेशी परत बोलावले आहे.
लॉर्ड्स कसोटीतील पराभवानंतर पीसीबीने संघात मोठे फेरबदल केले आहेत. खराब फॉर्ममध्ये असलेल्या ७ खेळाडूंना तिसऱ्या कसोटीआधीच पाकिस्तानला परत पाठवण्यात आले असून, त्यांच्या जागी तरुण व नवोदित खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. अनेक प्रशिक्षकांना काढून टाकण्यात आले आहे. व्हाईट-बॉल प्रशिक्षक मायकल हेसन यांच्याकडे तिसऱ्या कसोटीसाठी तात्पुरती जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
तिसरा सामना 9 सप्टेंबर रोजी सुरू होणार आहे. त्याआधी कर्णधार बाबर आझमबाबत एक महत्वाची बातमी समोर आली आहे. एकीकडे संघात एवढी उलथापालथ सुरू असताना, दुसरीकडे कर्णधार बाबर आझमच्या अडचणीत अधिकच वाढ झाली आहे. लॉर्ड्स कसोटीच्या दोन्ही डावांत (८ आणि ६ धावा) फ्लॉप ठरलेल्या बाबरला तिसऱ्या कसोटी आधी आजारी असल्याचे समोर आले आहे.
पाकिस्तानच्या मीडिया टीमने बाबर आझम आजारी असल्याच्या बातमीला दुजोरा दिला आहे. वैद्यकीय पथक त्याच्या आरोग्यावर सतत लक्ष ठेवून असून, ९ सप्टेंबरपासून बर्मिंगहॅम (एजबॅस्टन) येथे सुरू होणाऱ्या तिसऱ्या व शेवटच्या कसोटी सामन्यापूर्वी तो पूर्णपणे बरा होईल असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. दरम्यान, मालिकेच्या मध्य्यातच अशा प्रकारे खेळाडूंना आणि प्रशिक्षकांना बाहेरचा रस्ता दाखवण्याच्या पीसीबीच्या निर्णयावर पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूंनी जोरदार ताशेरे ओढले असून, कर्णधार बाबर आझमच्या नेतृत्वावरही मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.






