पाकिस्तान क्रिकेट टेस्ट संघाचा खराब रेकॉर्ड (फोटो- ians)
पाकिस्तान क्रिकेट संघ सध्या आपल्या इतिहासातील अत्यंत वाईट आणि निराशाजनक टप्प्यातून जात आहे. सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर असलेल्या पाकिस्तानी संघाचा पहिल्या दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये लाजीरवाणा पराभव झाला आहे. पाकिस्तानने सिरिज गमावली आहे. मात्र त्यासोबतच कर्णधार बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानी संघाच्या नावावर एक असा नकोसा विक्रम नोंदवला गेला आहे, जो १९८७ नंतर कधीही घडला नव्हता. बाबर आझम सातत्याने कर्णधार म्हणून अपयशी ठरताना दिसून येत आहे.
ENG Vs PAK: क्रिकेट असे खेळा की लोक दगड हाणतील! इंग्लंडने पाकिस्तानची केली दुर्दशा, केवळ…
इंग्लंडविरुद्धच्या सलग दोन पराभवांमुळे पाकिस्तानच्या कसोटी क्रिकेट इतिहासात प्रथमच पराभवांची संख्या विजयांपेक्षा जास्त झाली आहे. १९८७ सालापासून आजपर्यंत पाकिस्तानने खेळलेल्या एकूण कसोटी सामन्यांमध्ये त्यांच्या विजयांची संख्या पराभवांपेक्षा जास्त होती. मात्र, या ताज्या पराभवानंतर पाकिस्तानने जिंकलेल्या कसोटींपेक्षा गमावलेल्या कसोटी सामन्यांची संख्या अधिक झाली आहे. तब्बल ३७ वर्षांनंतर पाकिस्तान क्रिकेट संघावर ही अत्यंत वाईट वेळ आली आहे.
कर्णधार बाबर आझमच्या नेतृत्वाखाली घडल्याने त्याच्यावर आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर चौफेर टीका केली जात आहे. दरम्यान कर्णधार म्हणून बाबर आझम हा अपयशी ठरताना दिसून येत आहे. बाबर आझमची वैयक्तिक कामगिरी आणि त्याचे नेतृत्व या दोघांवरही माजी क्रिकेटपटूंनी आणि चाहत्यांनी सडकून टीका केली आहे.इंग्लंडने दोन्ही सामन्यात पाकिस्तानचा दारुण पराभव केला आहे. त्यामुळे पाकिस्तानने ही सिरिज जिंकली आहे.
खळबळ उडाली! Babar Azam च्या हाताला दुखापत; England विरुद्ध खेळणार की नाही?
सामन्यांच्या कसोटी सिरिजमध्ये इंग्लंडने २-० अशी अजिंक्य आघाडी घेतली आहे. या सिरिजमध्ये तिसरा आणि अंतिम सामना आता केवळ औपचारिकतेसाठी खेळवला जाणार असून, स्वतःची उरलीसुरली प्रतिष्ठा वाचवण्यासाठी पाकिस्तानला या सामन्यात विजय मिळवणे अनिवार्य असेल.






