Paris Paralympics 2024 Rinku Hooda
Paris Paralympics 2024, Rinku Hooda : पॅरिस पॅरालिम्पिक गेम्स 2024 आजपासून सुरू होत आहेत. त्याचबरोबर या मेगा इव्हेंटचे सेलिब्रेशन 8 ऑगस्ट रोजी होणार आहे. या स्पर्धेत जगभरातून एकूण 4400 खेळाडू सहभागी होणार आहेत. पॅरिस पॅरालिम्पिक 2024 साठी भारताने एकूण 84 खेळाडू पाठवले आहेत. पॅरालिम्पिकमध्ये भारताचा हा आतापर्यंतची सर्वात मोठी तुकडी आहे. खरं तर टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी 5 सुवर्णपदकांसह 19 पदके जिंकली होती. यामध्ये भारतातील 54 खेळाडू सहभागी झाले होते. मात्र, यावेळी भारताच्या पदकांची संख्या २० च्या पुढे जाऊ शकते, असे मानले जात आहे.
भारतातील 10 खेळाडू होणार सहभागी
भालाफेकमध्ये भारतातील 10 खेळाडू सहभागी होत आहेत. ज्यामध्ये सुमित अंतिल, संदीप, अजित सिंह, रिंकू हुडा, नवदीप, प्रवीण कुमार, भावनाबेन चौधरी, दीपेश कुमार, सुंदर सिंह गुर्जर आणि संदीप संजय सरगर यांच्या नावांचा समावेश आहे. अलीकडेच पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने रौप्यपदक जिंकले. त्याचवेळी भालाफेकपटू रिंकू हुड्डा या पॅरालिम्पिक स्पर्धेत पदक जिंकण्याची प्रबळ दावेदार आहे. भारताला रिंकू हुडाकडून खूप आशा आहेत. तसेच या खेळाडूने आपल्या कामगिरीने आपण भारतासाठी पदक जिंकू शकतो हे सिद्ध केले आहे.
पदक जिंकण्याची जबाबदारी या खेळाडूंवर….
शॉट पुट – सचिन सर्जेराव, मनू, रवी रोंगाली, मोहम्मद यासिर, रोहित कुमार, सुमन राणा, भाग्यश्री माधवराव
उंच उडी – निषाद कुमार, मरियप्पन थांगावेलू, रामपाल, शैलेश कुमार, शरद कुमार, प्रवीण कुमार
डिस्कस थ्रो – योगेश कथुनिया, कांचन लखानी, करमज्योती, साक्षी कसाना
क्लब थ्रो – धरमबीर, प्रणव सुरमा, अमित कुमार
100/200/400/1500 मीटर शर्यत – दीप्ती जीवनजी, प्रीती पाल, दिलीप गावित, रक्षिता राजू, सिमरन
धनुर्विद्या – हरविंदर सिंग, राकेश कुमार, श्याम सुंदर स्वामी, पूजा, सरिता, शीतल देवी
बॅडमिंटन – मनोज सरकार, नितेश कुमार, कृष्णा नगर, शिवराजन सोलेमलाईम, सुहास यथीराज, सुकांत कदम, तरुण, नित्या श्री सुमाथी, मनदीप कुमार, मानसी जोशी, पलक कोहली, तुलसीमती मुरुगेसन, मनीषा रामदास.
रोइंग – प्राची यादव, यश कुमार, पूजा ओझा
सायकलिंग – अर्शद शेख, ज्योती गजेरिया
अंध ज्युडो – कपिल परमार, कोकिला
पॉवरलिफ्टिंग – परमजीत कुमार, अशोक, सकिना खातून, कस्तुरी राजमणी
रोइंग – अनिता, नारायण कोंगनापल्ले
शूटिंग – आमिर अहमद, अवनी लेखरा, मोना अग्रवाल, निहाल सिंग, मनीष नरवाल, रुद्रांश खंडेलवाल, सिद्धार्थ बाबू, श्रीहर्ष रामकृष्ण, स्वरूप उन्हाळकर, रुबिना फ्रान्सिस
टेबल टेनिस – सोनलबेन पटेल, भाविनाबेन पटेल
जलतरण – सुयश नारायण जाधव – 50 मीटर बटरफ्लाय
तायक्वांदो – अरुणा