ऑलिम्पिकच्या जल्लोषात गुगल मग्न; आजचे डूडल खास जिम्नॅस्टिक खेळासाठी
पॅरिस ऑलिम्पिक 2024: पॅरिस ऑलिम्पिक 2024 ला 26 जुलैपासून सुरू झाले आहे. या स्पर्धेच्या दुसऱ्याच दिवशी भारताला देशाचे पहिले पदकही मिळाले आहे. गुगल कंपनी देखील पॅरिस ऑलिम्पिकचा जल्लोष खास पद्धतीने साजरा करत आहे. ऑलिम्पिकला सुरूवात झालेल्या दिवसापासून गुगल दररोज एक नवीन डूडल जारी करत आहे.
आजचे डूडल जिम्नॅस्टिक या खेळाला समर्पित केले आहे. या गुगल डूडलवर क्लिक करताच तुम्हाला कलात्मक जिम्नॅस्टिक्सची सर्व माहिती तुमच्या स्क्रीनवर मिळेल. तुम्ही डूडलसह कलात्मक जिम्नॅस्टिक्सचे निकाल, पदके, हायलाइट्स, तसेच टाइम टेबल पाहू शकता.
गुगलने या ॲनिमेटेड डूडलमध्ये पक्षी आणि मांजर दाखवले आहे. निळा रंगाचा पक्षी कलात्मक जिम्नॅस्ट खेळाडूच्या स्वरूपात आहे. तर मांजर परिक्षक बनले आहे. पक्षाने जिम्नॅस्टिक करून दाकवले आहे. तर मांजराने त्याला खेळासाठी गुण दिले आहेत. या डूडलची थीम ‘जिम्नॅस्टिक्स आणि समर गेम्स अशी ठेवण्यात आली आहे.’ गुगलने या डूडलचे खास वर्णनही केले आहे, ‘कलात्मक जिम्नॅस्टिक्सची सुरुवात! चाहते आनंदाने उड्या मारत आहेत, तर या वेळी खेळांडूनकडून अपेक्षा वाढल्या आहेत.’ पॅरिस गेम्स सुरू झाले तेव्हाही गुगलने खास डूडल तयार केले होते. विशेषत: पॅरिस ऑलिम्पिकसाठी गुगलचे हे चौथे डूडल आहे.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये देशाला पहिले पदक मिळाले
पॅरिस ऑलिम्पिकचा दुसरा दिवस भारतासाठी खास होता, कारण भारताने देशाचे पहिले पॅरिस ऑलिम्पिक जिंकले होते. ऑलिम्पिकच्या दुसऱ्या दिवशी मनू भाकरने महिला नेमबाजीत कांस्यपदक जिंकून देशाचा गौरव केला. मनूने 10 मीटर एअर पिस्तुलच्या अंतिम फेरीत पोहोचून आपले खास स्थान निर्माण केले.