Google ने साजरा केला पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्केटबोर्डिंग इव्हेंट खास डूडलसह
कालपासून 2024 पॅरिस ऑलिम्पिकला सुरूवात झाली आहे. आज गुगलने (27 जुलै) एक खास डूडल बनवले आहे. जे कॉन्कॉर्ड येथे नियोजित स्केटबोर्डिंग इव्हेंट्स साजरे करत आहे. Google ने हा इव्हेंट ॲनिमेटेड डूडलसह साजरा केला आहे. यामध्ये घराच्या छतावर कोंबड्यांचा स्केटबोर्डिंगचा ग्रूप दिसत आहे.
या डूडल मधील ॲनिमेटेड पात्र पक्षांच्या स्वरुपात दिसत आहे. यात ही पात्रे दोन्ही बाजूला स्केटबोर्ड घेऊन उभे असलेले दिसत आहे. तसेच एक पात्र स्केटबोर्डिंग करत आहे. Google चे हे खास डूडल आज पुरुषांसाठी स्केटबोर्डिंग इव्हेंट चिन्हांकित करते. आज स्केट बोर्डंगच्या दोन राऊंड होणार आहेत. पुरुषांच्या स्ट्रीट प्रीलिम्स दुपारच्या वेळी आणि अंतिम फेरी संध्याकाळच्या वेळी होणार आहे. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये ब्रेकिंग, सर्फिंग, स्पोर्ट्स क्लाइंबिंगसह स्केटबोर्डिंग या चार नवीन खेळांचा करण्यात आला आहे.
पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी 200 हून अधिक देशांतील खेळाडू, 32 क्रीडा शाखांमधील 329 स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी फ्रान्सच्या राजधानीत एकत्र आले आहेत. पॅरिस ऑलिम्पिक खेळ 26 जुलै रोजी सुरू झाले असून 11 ऑगस्ट रोजी संपणार आहेत.
या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत 70 भारतीय खेळाडू पहिल्यांदाच खेळणार आहेत. भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (IOA) 117 खेळाडूंचा ताफा पॅरिसला पाठवला आहे. यापैकी 70 खेळाडू ऑलिम्पिकमध्ये खेळणार आहेत. यामध्ये 47 भारतीय खेळाडू आहेत ज्यांनी ऑलिम्पिकमध्ये एक किंवा अधिक वेळा भाग घेतला आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्रा, मीराबाई चानू, लोव्हलिना आणि पीव्ही सिंधू यांच्याकडून पुन्हा एकदा पदकांची अपेक्षा आहे.