फोटो सौजन्य - सोशल मीडिया
पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ : पॅरालिम्पिक हा संपूर्ण जगभरामध्ये पहिली जाणारी स्पर्धा आहे. यामध्ये अनेक अद्भुत आणि अविश्वसनीय प्रसंग आणि विक्रम पाहायला मिळतात. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये एक फेन्सिंग करणारी प्रेग्नेंट महिला सहभागी झाली होती. हे समजल्यानंतर सर्वच आश्चर्य चकित झाले होते. आता पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये एक अतिशय मनोरंजक दृश्य दिसले, जिथे ७ महिन्यांच्या गर्भवती पॅरा ॲथलीटने पदक जिंकून इतिहास रचला. हा पराक्रम ग्रेट ब्रिटनच्या जोडी ग्रिनहॅमने केला आहे. प्रत्येकजण जोडी ग्रिनहॅमच्या व्यक्तिमत्वाला सलाम करत आहे. आई ही खरी योद्धा आहे हे सर्वानाच माहिती आहे. जोडी ग्रिनहॅमने तिरंदाजीमध्ये पदक जिंकले. आता त्याचे जगभरातून कौतुक होत आहे. त्याच्या धाडसाचे सर्वजण कौतुक करत आहेत.
हेदेखील वाचा – बांग्लादेश विरुद्ध पाकिस्तान कसोटी सामन्यात पाकचा संघ बरोबरी करणार की आणखी एक पराभव
जोडी ग्रिनहॅमने हिने कांस्यपदक नावावर केले आहे. ३१ ऑगस्ट रोजी, जोडी ग्रिनहॅमने महिलांच्या कंपाऊंडमध्ये ग्रेट ब्रिटनच्या फोबी पॅटरसन पेनविरुद्ध कांस्यपदकाचा सामना खेळला आणि १४२-१४१ गुणांसह विजय मिळवला. जोडी ग्रिनहॅम गर्भवती असताना पॅरालिम्पिकमध्ये पदक जिंकणारी पहिली पॅरा ॲथलीट ठरली. ती सुमारे २८ आठवड्यांची म्हणजेच ७ महिन्यांची गर्भवती होती. असे असतानाही त्याने पॅरालिम्पिकमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आणि पदक जिंकून त्याने आपले नाव इतिहासाच्या पानांमध्ये नोंदवले.
Seven months pregnant and Jodie Grinham is collecting a bronze medal at the Paralympic Games. 🤩🥉#ParaArchery #ArcheryInParis pic.twitter.com/iGGzI1EHZK
— World Archery (@worldarchery) September 1, 2024
दैनिक जागरणच्या माहितीनुसार, कांस्यपदक जिंकल्यानंतर जोडी ग्रिनहॅमने सांगितले की, फोकस करताना मुलाने पोटात लाथ मारणे थांबवले नाही. जणू काही मूल विचारत आहे, आई, तू काय करतेस? पण माझ्या पोटातील हा आधार बुडबुडा एक सुंदर आठवण आहे. मला माझा अभिमान आहे. मी अडचणींचा सामना केला आहे आणि ते अजिबात सोपे नव्हते. “मी आणि बाळ निरोगी असलो तरी.”