आयपीएल 2026 मधील राजस्थान रॉयल्स संघाचे नवीन मालक कैलास सोमाणी यांची माहिती देणारा लेख (फोटो -सोशल मीडिया)
Rajasthan Royals Owner Kailash Somani IPL : मुंबई : सध्या भारतामध्ये आयपीएल 2026 चा थरार सुरु असून मॅच रंगामध्ये आल्या आहेत. यंदाच्या आयपीएलमध्ये फक्त खेळ किंवा खेळाडू नाही तर संघाचे मालक देखील चर्चेत आले आहेत. Rajasthan Royalsचे नवे मालक कैलाश सोमानी यांच्या चर्चा वाढल्या आहेत. एका सामान्य कुटुंबातून येणाऱ्या कैलाश सोमानी यांनी तब्बल 15 हजार कोटी रुपयांचा आयपीएल संघ विकत घेतल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. त्यांचा हा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे.
१५ ऑगस्ट १९७४ रोजी वाशिम येथे जन्मलेले कैलाश सोमानी हे एका साध्या मध्यमवर्गीय कुटुंबातून येतात. त्यांनी पूर्ण प्रयत्नांने व्यवसाय करुन आपल्या प्रवासाला सुरुवात केली. आज त्यांच्या मेहनतीची चर्चा फक्त देशात नाही तर जागतिक पातळीवर होत आहे. जागतिक व्यावसायिक विश्वात कैलाश सोमानी यांनी आपली एक ओळख निर्माण केली आहे. एडटेक, डेटा प्रायव्हसी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स यांसारख्या अत्याधुनिक क्षेत्रांमध्ये उभारलेला त्यांचा व्यवसाय आता अशा टप्प्यावर पोहोचला आहे, जिथे राजस्थान रॉयल्ससारखा एक प्रतिष्ठित संघ विकत घेऊन त्यांनी हे दाखवून दिले आहे की योग्य दिशेने उचललेले प्रत्येक पाऊल अखेरीस विलक्षण यश मिळवून देते.
हे देखील वाचा : बॅन बॅन बॅन…! पुन्हा ‘ही’ चूक केल्यास Shreyas Iyer ला महागात पडणार; BCCI मोठी कारवाई करणार
इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलमध्ये फ्रँचायझी मिळवण्याचा त्यांचा प्रवास केवळ प्रेरणादायीच नव्हे, तर परिवर्तन घडवणारा ठरला आहे. त्यांनी १.६३ अब्ज डॉलर्स (अंदाजे १५,२८६ कोटी रुपये) मध्ये राजस्थान रॉयल्सची मिळवलेली मालकी याने त्यांना जागतिक क्रीडा गुंतवणूकदारांच्या उच्चभ्रू गटात स्थान मिळवून दिले आहे .सोमानी एका मध्यमवर्गीय कुटुंबात वाढले. त्यांना सुरुवातीच्या काळात अनेकदा आर्थिक अडचणीचा सामना करावा लागला.वयाच्या १६ व्या वर्षी वडील नंदकिशोर सोमानी यांच्या अकाली निधनानंतर, त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी आली. या कठीण परिस्थितीतही, त्यांनी शिक्षणाची कास सोडली नाही.
वाशिम येथील मुळीबाई चरखा विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर, त्यांनी शेगाव येथील संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयातून संगणक अभियांत्रिकीची पदवी मिळवली. क्रिकेटची प्रचंड आवड असूनही, त्यांच्या घरी टीव्हीसुद्धा नव्हता, पण त्यांनी आपली स्वप्ने शिक्षण आणि कौशल्य विकासाकडे वळवली. हाच निर्णय पुढे त्यांची सर्वात मोठी ताकद बनला.
आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा
हैदराबादमधील विस्ताराची योजनाही सुरू आहे, जी त्यांचा वाढता प्रभाव आणि भविष्यातील दिशा दर्शवते.
हे देखील वाचा : नादच खुळा! RR च्या रवी बिश्नोईने Gujrat Titans ची ‘टायटॅनि’क बुडवली; गिलच्या टीमचा 6 रन्सने पराभव
आपल्या मुळांशी जोडलेले
जागतिक यश मिळवूनही, कल सोमानी आपल्या मुळांशी घट्ट जोडलेले आहेत. त्यांनी अकोला-नागपूर महामार्गावरील तळेगाव शामजीपंत येथे क्रिकेट अकादमी स्थापन करून तळागाळातील प्रतिभेला प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे. त्यांनी गरजू विद्यार्थ्यांना उत्तम प्रशिक्षण आणि संधी उपलब्ध करून देण्यासाठी १ कोटी रुपयांचे योगदानही दिले आहे.
हा करार विशेष का आहे?






