Rohit Sharma (फोटो- ians)
रोहित शर्माने एमआयसाठी रचला नवा रेकॉर्ड
6 हजार धावांचा टप्पा केला पार
कालच्या सामन्यात दुखापतीमुळे झाला रिटायर्ड हर्ड
Rohit Sharma RCB vs MI: काल मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (IPL 2026) यांच्यात सामना पार पडला. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाने प्रथम फलंदाजी करून 240 रन्स केल्या. मुंबईची फलंदाजी 241 रन्सचा पाठलाग करताना ढेपाळली. 18 रन्सने मुंबई पलटणचा पराभव झाला. मात्र रोहित शर्माने एक नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
मुंबई इंडियन्सकडून खेळताना भारतीय संघाचा आणि मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माने एक नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. त्यान मुंबईकडून खेळताना 6 रन्सचा टप्पा पूर्ण केला आहे. मुंबई इंडियन्ससाठी 6 हजार रन्स करणारा रोहित शर्मा हा पहिला फलंदाज ठरला आहे. त्यामुळे रोहित शर्माने एक नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.
एखाद्या संघासाठी सर्वाधिक रन्स करण्याच्या लिस्टमध्ये रोहित शर्मा दुसऱ्या स्थानी आहे. विराट कोहली या यादीत पहिल्या स्थानी आहे. त्याने आरसीबीसाठी 8 हजार पेक्षा जास्त रन्स केल्या आहेत.
सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
1. विराट कोहली
2. रोहित शर्मा
3. एम. एस. धोनी
4. सुरेश रैना
5. ए. बी. डीव्हीलीयर्स
हार्दिक पांड्याची सेना पुन्हा अपयशी
IPL 2026 मध्ये, स्पर्धेतील 20 वा सामना रविवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (MI vs RCB) यांच्यात खेळवला गेला. या सामन्यात बंगळुरुने मुंबईचा 18 धावांनी पराभव केला आहे. त्याआधी, मुंबई इंडियन्सने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने 20 षटकात 4 विकेट गमावून 241 धावांचे लक्ष्य ठेवले. वानखेडे स्टेडियमवर आयपीएलमधील आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या नोंदवून बंगळुरूने इतिहास रचला. त्यानंतर प्रत्युत्तरात मुंबईचा संघ 20 षटकात 5 विकेट गमावून 222 धावा करु शकला.
SRH Vs RR Playing 11: ‘एसआरएच’, ‘आरआर’च्या गोलंदाजांची धुलाई निश्चित; अभिषेक, वैभव अन्…
या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 240 धावा केल्या; वानखेडे स्टेडियमवर आयपीएलमध्ये कोणत्याही संघाने नोंदवलेली ही आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या आहे. बंगळुरूने आपलाच जुना विक्रम मोडीत काढून हा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. 2015 मध्ये, बंगळुरूने याच मैदानावर 235 धावांची धावसंख्या उभारली होती वानखेडेवरील आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्या म्हणून हा विक्रम 11 वर्षे अबाधित राहिला होता मात्र आता RCB नेच तो विक्रम मोडीत काढला आहे.






