Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

 Rohit Sharma Birthday Special : ज्याला गोलंदाज कापतात, जो वनडेमध्ये ३ द्विशतकं लगावतो, अशा ‘हिटमॅन’च्या ‘या’ खास गोष्टी..  

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माचा आज  ३० एप्रिल २०२५ रोजी त्याचा ३८ वा वाढदिवस साजरा करत आहे. रोहित शर्माने आपल्या आजवरच्या क्रिकेट करकीर्दीमध्ये अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Apr 30, 2025 | 09:55 AM
Rohit Sharma Birthday Special: These special things about the 'hitman' who is cut by bowlers, who scores 3 double centuries in ODIs..

Rohit Sharma Birthday Special: These special things about the 'hitman' who is cut by bowlers, who scores 3 double centuries in ODIs..

Follow Us
Close
Follow Us:

Rohit Sharma Birthday Special : भारतीय संघाचा कर्णधार ज्याला ‘हिटमॅन’ म्हणून ओळखले जाते अशा रोहित शर्माचा आज वाढदिवस आहे.  ३० एप्रिल २०२५ रोजी रोहित शर्मा ३८ वा वाढदिवस साजरा करत आहे. रोहित शर्माचा जन्म १९८७ मध्ये महाराष्ट्रातील नागपूर या शहरात झाला आहे. भारतीय संघात खेळताना आणि कर्णधारपद भूषवताना रोहितने अनेक मोठे विक्रम केले आहे. धोनीनंतर यशस्वी कर्णधार म्हणून रोहित शर्माचे नाव घेतले जाते.  धोनीनंतर टी-२० आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारा तो पहिला कर्णधारही बनला आहे. रोहित शर्मा हा असा खेळाडू आहे ज्याला सर्वोत्तम गोलंदाज देखील घाबरून राहतात. आज त्याच्याच बाबत आपण जाणून घेणार आहोत.

रोहित शर्मा हा जगातील एकमेव असा फलंदाज आहे ज्याच्या नावावर  एकदिवसीय सामन्यात ३ द्विशतके जमा आहेत. तसेच एकदिवसीय क्रिकेटमध्ये वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम देखील रोहितच्या नावावर नोंदवला गेला आहे. तो भारतीय संघासाठी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके ठोकणारा फलंदाज ठरला आहे. भारतीय संघाला टी-२० विश्वचषक जिंकवून दिल्यानंतर त्याने -२० मधून् निवृत्ती घेतली आहे.

हेही वाचा : IPL २०२५ : आयपीएलच्या मधल्या षटकांमध्ये ‘मिस्टर ३६०’ ची जादू कायम, सूर्याच्या १० वेळा २५ पेक्षा जास्त धावा अन् ..

 २००७ मध्ये पदार्पण

रोहित शर्माने २००७ मध्ये आयर्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. त्यानंतर रोहित शर्माने आयपीएलमध्ये आपला दबदबा कायम राखला. त्याची आयपीएल कारकीर्दही खूपच बहारदार राहिली आहे. रोहित शर्माने २००८ मध्ये डेक्कन चार्जर्सकडून पहिल्या आयपीएल हंगामात पदार्पण केले होते, त्यानंतर तो मुंबई इंडियन्समध्ये गेला आणि जिथे त्याने संघाचे नेतृत्व करणे स्वीकारले आणि संघाला ५ वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवून दिले. शर्माच्या नेतृत्वाखाली, मुंबई इंडियन्सने पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावले आहे.  ज्यामुळे मुंबई  इंडियन्स आयपीएलच्या इतिहासातील संयुक्तपणे सर्वात यशस्वी संघ बनला आहे. वयाच्या ३८ व्या वर्षीही तो त्याच्या संघासाठी स्फोटक खेळी खेळताना दिसून येत आहे.

त्याला व्हायचे होते गोलंदाज, झाला फलंदाज

रोहित शर्माने धावांच्या बाबत अनेक विक्रम मोडीत काढले आणि अनेक विक्रम रचले आहेत. पण त्याला प्रथम गोलंदाज बनायचे होते. त्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात ही एक ऑफ-स्पिनर म्हणून केली होती. आयपीएलमध्ये हॅटट्रिक घेणारा तो पहिला भारतीय गोलंदाजही ठरला आहे.

एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक द्विशतके

रोहित शर्मा हा एकदिवसीय सामन्यात तीन द्विशतके करणारा एकमेव खेळाडू आहे. रोहितने २०१३ मध्ये बेंगळुरू येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध २०९ धावा केल्या होत्या. त्यानंतर २०१४ मध्ये कोलकात्यातील ईडन गार्डन्स येथे श्रीलंकेविरुद्ध त्याने २६४ धावांचा विश्वविक्रम केला होता.  त्यानंतर पुन्हा एकदा  २०१७ मध्ये त्याने श्रीलंकेविरुद्ध २०८ धावांची नाबाद खेळी साकारली होती.

टी-२० मध्ये सर्वाधिक शतके

रोहितने टी-२० मध्ये पाच शतके झळकावली आहेत आणि या फॉरमॅटमध्ये पाच शतके झळकावणारा सदया तो एकमेव खेळाडू आहे. रोहितने २०१५ मध्ये धर्मशाला येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १०६ धावा काढल्या होत्या. त्यानंतर २०१७ मध्ये इंदूर येथे श्रीलंकेविरुद्ध खेळताना त्याने ११८ धावांची खेळी केली होती. त्यानंतर, त्याने २०१८ मध्ये इंग्लंडविरुद्ध नाबाद १०० धावा आणि त्याच वर्षी पुन्हा एकदा लखनौमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध नाबाद १११ धावा केल्या होत्या.

हेही वाचा : ‘निर्भय दृष्टिकोन, चेंडूवर सर्व ऊर्जा ओतणे’, शतकवीर Vaibhav Sooryavanshi चे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने केले खास कौतुक.. 

विश्वचषकात सर्वाधिक शतके

रोहित शर्माने विश्वचषकात एक असा विक्रम केला आहे जो मोडणे खूप कठीण मानले जात आहे. रोहित हा एकाच एकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक शतके झळकवणारा खेळाडू आहे. २०१९ मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषकात हिटमनने ५ शतके केली  होती.  त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाबाद १२२, इंग्लंडविरुद्ध १०२, पाकिस्तानविरुद्ध १४०, श्रीलंकेविरुद्ध १०३ आणि बांगलादेशविरुद्ध १०४ धावा केल्या.

रोहित शर्माची क्रिकेट कारकीर्द

रोहित शर्माने आतापर्यंत २७३ एकदिवसीय सामने खेळले आहेत, त्यामध्ये त्याने १११६८ धावा केल्या आहेत. या काळात त्याने ३२ शतके देखील  झळकावली आहेत. तर टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहितने १५९ सामन्यांमध्ये ४२३१ धावा केल्या आहेत. या काळात त्याने ५ शतके झळकावली आहेत. त्याच्या कसोटी क्रिकेटबद्दलच्या कारकीर्दीबद्दल सांगायचे झाले तर त्याने ६७ सामन्यांच्या ११६ डावात ४३०१ धावा केल्या. या काळात त्याने १२ शतके देखील लगावले आहेत.

Web Title: Rohit sharma is celebrating his 38th birthday today here are some special things about him

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 30, 2025 | 09:55 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.