Sara Tendulkar's formidable entry into cricket! She became the owner of 'this' team in GEPL..
मुंबई : सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर क्रिकेटपटू बनला. मात्र आता सचिनची लेक सारा तेंडुलकर हिनेही क्रिकेटमध्ये एण्ट्री केली आहे. तिने ‘ग्लोबल ई-क्रिकेट प्रीमियर लीग’ मध्ये (जीईपीएल) मुंबईचा संघ विकत घेतला असून ती आता एका संघाची मालकीण बनली आहे. ‘ग्लोबल ई-क्रिकेट प्रीमियर लीग’ने ही घोषणा केली आहे.
मुंबईच्या संघाची मालकीण बनल्यानंतर सारा तेंडुलकर म्हणाली, ‘वडील सचिन तेंडुलकर यांच्यामुळे आमच्या रक्तातच क्रिकेट आहे. त्यामुळे क्रिकेट हा माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग आहे. ‘ग्लोबल ई-क्रिकेट प्रीमियर लीग’मध्ये संघ खरेदी करण्यासाठी मी उत्सुक होते.
हेही वाचा : PAK vs NZ : न्यूझीलंडला मोठा धक्का! पाकविरुद्धच्या वनडे मालिकेतून बडा खेळाडू बाहेर
ग्लोबल ई-क्रिकेट प्रीमियर लीगच्या पहिल्या सत्रात 200,000 खेळाडूंकडून नाव नोंदणी करण्यात आली होती. परंतु ग्लोबल ई-क्रिकेट प्रीमियर लीग 2025 मध्ये एकूण 910,000 खेळाडूंकडून नाव नोंदणी करण्यात आली आहे. ग्लोबल ई-क्रिकेट प्रीमियर लीगकडून Instagram वर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. त्यामध्ये सारा तेंडुलकरने ग्लोबल ई-क्रिकेट प्रीमियर लीगमध्ये मुंबई फ्रँचायझी विकत घेतली असल्याची माहिती देण्यात आली आहे.
मुंबईची मालकीण झाल्यानंतर, सारा तेंडुलकरने प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली, ‘क्रिकेट हा आमच्या कुटुंबाचा अविभाज्य भाग आहे. ई-स्पोर्ट्समध्ये क्षमता शोधणे हे खूप रोमांचक असणार आहे. ग्लोबल ई-क्रिकेट प्रीमियर लीगमधील मुंबई फ्रँचायझीची मालकी होणे हे एक स्वप्न पूर्ण झाले आहे. मी ई-स्पोर्ट्स फ्रँचायझी तयार करण्यासाठी आमच्या दमदार संघासोबत काम करण्यास खुप उत्सुक आहे आणि हे काम मला प्रेरणा देईल.”
हेही वाचा : PBKS vs RR : आज पंजाब किंग्ज-राजस्थान रॉयल्स आमनेसामने; जयस्वालच्या खेळीकडे असणार लक्ष..
सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर हा देखील क्रिकेट विश्वात आपले नाव करण्यासाठी मेहनत घेत आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो मुंबई आणि गोव्याकडून खेळला असून तो आयपीएलमध्ये देखील खेळला आहे.
आयपीएल 2025 च्या 18 व्या हंगामात मुंबई इंडियन्सला चांगली कामगिरी करता आलेली नाही. लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात खेळवण्यात आलेल्या सामन्यात एलएसजीने विजय मिळवला. लखनौ सुपर जायंट्स संघाने मुंबई इंडियन्सला 12 धावांनी पराभूत केले आहे. या विजयासह एलएसजीने या हंगमातील दूसरा विजय मिळवला आहे. तर मुंबई इंडियन्सला मात्र तिसऱ्यांदा पराभवाचा सामना करावा लागला.