Aaaah! 6,6,6,6,6.. Shivam Mavi's storm in Uttar Pradesh T20; Fireworks of five sixes in one over
Uttar Pradesh T20 League : उत्तर प्रदेश टी20 लीग स्पर्धेचा थरार सुरू झाला आहे. या स्पर्धेतील दुसऱ्याच सामन्यात टी20 लीगमध्ये शिवम मावीचे रुद्र रूप बघायला मिळाले. काशी रुद्रास आणि गोरखपूर लायंस यांच्यात उत्तर प्रदेश टी20 लीगमधील दूसरा सामना पार पडला. या सामन्यात काशी रुद्रासने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. परंतु, संघाची सुरवात वाईट झाली. एकामागे एक विकेट पडत होत्या आणि धावसंख्याही वाढत नव्हती. 14 षटकांत 7 गडी गमावून फक्त 89 धावा काढल्यानंतर संघ चांगलाच अडचणीत आला. परंतु, नियतीला काही वेगळं मंजूर असावं. आठव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या गोलंदाज शिवम मावीने आपला जलवा दाखवत धाडाकेबाज खेळी केली. त्याने आक्रमक अर्धशतकही झळकावले. मावीने अवघ्या 19 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याच्या आक्रमक खेळीच्या जोरावर काशी रुद्रास संघाने 20 षटकात 8 गडी गमवून 176 धावा उभ्या केल्या.
हेही वाचा : T20 Asia Cup मध्ये सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू कोण? हार्दिक पंड्याकडे त्याला मागे टाकण्याची नामी संधी
शिवम मावीने 21 चेंडूंचा सामना करत आक्रमक 54 धावांची खेळी साकारली. या खेळीत त्याने खणखणीत 6 षटकारांचा पुस पाडला. त्याने 257.14 च्या स्ट्राईक रेटने या धावा फटकावल्या. दुसऱ्या टोकाकडून शिवम मावीला शिवा सिंगने चांगली साथ दिली. आठव्या विकेटसाठी शिवमने सिंगसोबत 87 धावांची भागीदारी रचली. शिवाने 17 चेंडूमध्ये नाबाद 34 धावांची महत्वाची खेळी केली.
18व्या षटकात तर क्रिकेटप्रेमींना चांगलाच कहर बघायला मिळाला आहे. मावीने एकाच षटकात पाच षटकारांची आतिषबाजी केली. पहिल्या तीन चेंडूवर शिवाने पाठोपाठ तीन षटकार खेचले. त्यानंतर चौथ्या चेंडूवर एक धाव घेतली आणि शिवमला स्ट्राईक दिली. शिवमने शेवटच्या दोन चेंडूवर दोन षटकार ठोकले. या षटकात फलंदाजांनी एकूण 31 धावा चोपल्या. गोरखपूर लायंसला या धावांचा पाठलाग करण्यात अपयश आले. गोरखपूर लायंस संघ 19.1 षटकात सर्वबाद 126 धावांच करू शकला. परिणामी हा सामना काशी रुद्रासने 50 धावांनी आपल्या नावावर केला.
हेही वाचा : इंग्लंड दौऱ्यात नाकाराले! आता बुची बाबू स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात झळकवले शतक; ‘या’ खेळाडूचा BCCIला इशारा
या सामन्यासाठी सामनावीराचा पुरस्कार शिवम मावीला मिळाला. त्याने 21 चेंडूत 54 धावा केल्या. तसेच 3.1 षटकात 24 धावा देत 3 गडी बाद केले. दुसरं इम्पॅक्ट प्लेयर बिहारी रायने गोलंदाजीत कहर केला. त्याने 4 षटकात 13 धावा देत 3 गडी बाद केले. तर कार्तिक यादवला 2 आणि सुनिल कुमारने 1 गडी बाद केला.