Shreyash Iyer : कधी कधी आपल्याला...; वैभव सूर्यवंशीबाबत श्रेयसचं मोठं विधान, सौजन्य : एआयएनएस
बंगरुळूत पावसामुळे पाचव्या टी-20 सामन्यावर पाणी फेरल्यानंतर श्रेयसने पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्याने विविध विषयांना हात घालताना वैभवला मालिकेत न मिळालेल्या संधीवरही भाष्य केले. तो म्हणाला की, संजू सॅमसन, अभिषेक शर्मा आणि ईशान किशन हे टॉप-3 मध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत असल्याने वैभवला संधी मिळाली नाही.
श्रेयस म्हणतो की, मला ठाऊक आहे, त्याच्या डोक्यात काय सुरू आहे, खासकरून जबदरस्त आयपीएल सीजननंतर, परंतु आपल्याला केव्हा केव्हा बेंचवर बसून वाट पहावी लागते. आमच्याकडे दोन शानदार ओपनर आहे, जे सातत्याने धावा करत आहेत.
तो पुढे म्हणतो की, मी फक्त त्याला सांगत आलो की, तुला संधी मिळेल. सॅमसन आणि अभिषेकने आपल्यासाठी विश्वचषक जिंकला आहे. ते सातत्याने धावा करत आहेत. तसेच आपण आपल्या प्रोसेसमध्ये सातत्य राखता व आणि तुमची मानसिकता अजून परिपक्व नसेल, तर सध्या संधी मिळण्याबाबत फारसा विचार करू नका.
वैभव सूर्यवंशीने 4 जुलैला मँचेस्टरमध्ये इंग्लंडविरुद्ध सीनियर इंडियासाठी डेब्यू केले. त्याने या मालिकेतील तीन सामन्यात सर्वसाधारण कामगिरी केली. झिम्बॉब्वेविरुद्ध टी-20 सीरिजमध्ये वैभवची कामगिरी चांगली राहिली. तीन सामन्यात 2 अर्धशतकांसह त्याने 151 धावा केल्या. या कामगिरीमुळे त्याला मालिकावीर म्हणून निवडण्यात आले.
त्यानंतर अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत त्याला संधी मिळाली नाही. एशियन गेम्समध्ये श्रीलंकेविरुद्ध 21 चेंडूंत त्याने 38 आणि फायनलमध्ये पाकिस्तानविरुद्ध 9 चेंडूंत 15 धावा केल्या. त्यानंतर वैभवला अद्याप पुढील संधीसाठी वाट पहावी लागत आहे.
आता वैभवला भारतीय संघासोबत 5 टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी न्यूझीलंड दौऱ्यावर जायचे आहे. ही मालिका 22 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. त्यामुळे आता वैभवला किवी संघाविरुद्ध खेळण्याची संधी मिळते की नाही, हे पहावे लागेल.






