

श्रीलंका 'ए' संपूर्ण स्पर्धेत अपराजीत
रविंदू फर्नांडो आणि गरुका संकेथला प्रत्येकी तीन विकेट
निशान मधुशंकाचे दमदार अर्धशतक
Asia Cup rising Stars : एसीसी मेन्स आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 मध्ये श्रीलंका 'ए' ने मस्तवाल पाकिस्तान 'ए' ( SL A vs PAK A) संघाला अवघ्या 1 विकेट्सने पराभूत करत, रिकाम्या हाताने घरी पाठवले. श्रीलंकेचं या स्पर्धेतील पहिले जेतेपद ठरले. याआधी प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानला 9 बाद 216 धावांचाच पल्ला गाठता आला होता. दरम्यान, श्रीलंकेने कसं बसं तरी अखेरच्या फलंदाजापर्यंत सामना ताणत हा सामना आपल्या नावे केला.
निशान मधुशंका (87)च्या दमदार अर्धशतकानंतर शेवटच्या फळीतील फलंदाजांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांचा घाम गाळला व आपल्या संघाला जेतेपद मिळवून दिले.
संपूर्ण स्पर्धेत आम्हालाच क्रिकेट कळतं अशा जोशात असलेल्या गतविजेत्या पाकिस्तानच्या खेळाडूंना यंदा श्रीलंकेनं क्रिकेट काय असतं ते दाखवून दिलं. कधी काळी आशिया खंडात नावाजलेली हे दोन्ही संघ सध्या आपल्या अस्तित्वाच्या लढाईत उतरले आहेत. दोन्ही संघांना आपल्या देशाचं नाव क्रिकेटमध्ये पुन्हा उजागर करायचं आहे. मात्र रडीचा डाव खेळणाऱ्या पाकिस्तानसाठी हे जरा कठिणचं आहे, कारण अंतिम सामना म्हणावा तसा रंगतदार झाला असला तरी श्रीलंकेने अखेरपर्यंत हार पत्कारली नाही.
श्रीलंकेच्या गोलंदाजांनी खासकरून अष्टपैलू रविंदू फर्नांडो (26/3) आणि गरुका संकेथ (46/3) यांनी सर्वोत्तम गोलंदाजी करत पाकिस्तानला 50 षटकात 216 धावांवर रोखले. यातूनच पाकिस्तानची फलंदाजी कशी झाली असेल हे कळते.
या सामन्यात श्रीलंकेबाबत खटकणारी गोष्ट अशी की, त्यांनी अवघ्या 216 धावांचा पाठलाग करताना सावध सुरुवाते केली. त्यांच्या या सावध सुरुवातीचा फटका त्यांना चांगलाच बसला, कारण सलामीला आलेले लसिथ क्रॉस्पुले (26) आणि सिनेथ जयवर्धने (20) भारत 'ए' विरुद्ध केलेल्या खेळीप्रमाणे कामगिरी करू शकले नाहीत. परिणामी 10 व्या षटकात श्रीलंकेने 60 धावांवर आपले दोन्ही सलामीवीर गमावले होते.
त्यानंतर कर्णधार पवन आणि अर्धशतक झळकावणाऱ्या निशाणने तिसऱ्या विकेटसाठी 80 धावांची भागीदारी रचली. दुसरीकडे, 24 वे षटक पाकिस्तानच्या फायद्याचं ठरलं, कारण या षटकात सुफियान मुकीमने पवन (30)ला त्रिफळाचीत तर निपुन धनंजयाला भोपळाही न फोडता माघारी धाडले. दरम्यान, खेळपट्टीवर टिकलेल्या मधुशंकाने 95 चेंडूंत 6 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने 87 धावा केल्या. मात्र मधुशंका बाद झाल्यानंतर त्यापुढील दोन विकेट झटपट पडले. अशात पाकिस्तान जिंकेल असे वाटत होते, मात्र अखेरच्या विकेटसाठी लहिरू समरकून (नाबाद 12 ) आणि गरुका संकेथ (नाबाद 4) ने पाकड्यांना आपले मनसुबे पूर्ण होऊ दिले नाहीत.
हा सामना सुरुवातीपासून श्रीलंका जिंकेल असे वाटत होते, पण पाकिस्तानने प्रत्येक बॉलवर अपील करत रडीचा आपला डाव कायम ठेवला. मग फिल्डर्स जवळ बोलवत फलंदाजांवर दबाव निर्माण करणे असो वा विनाकारण अपील करणं असो, त्यांची ही रडू'निती' अखेर कामी आली नाही.